Share

अहंकार नसेल तरच महाविकास आघाडीची चाकं पुढे जातील; भुजबळ-कांदेंच्या वादावर राऊतांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद समोर आला होता. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आपत्कालीन निधीतून मदत देण्याच्या विषयावरून नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात नांदगाव येथे आयोजित आढावा बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता.

कोल्हापूर, सांगलीच्या धर्तीवर नांदगावातील पूरग्रस्तांना जिल्हा नियोजन समितीकडून पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेला आपत्कालीन निधी तातडीने उपलब्ध करण्याची मागणी कांदे यांनी केली होती. पण भुजबळ यांनी कांदे यांना शांत राहण्यास सांगितले होते. यावरून बैठकीत मोठा वाद निर्माण झाला होता. याबाबत आता शिवसेना खासदार संजय राऊत प्रतिक्रिया दिली आहे.

काही वाद विकोपाला गेलेला नाहीये. दोन्हीही महाविकास आघाडीचेच लोकं आहेत. एकमेकांचा सन्मान राखणं गरजेचं आहे. सुहास कांदे निवडणून आलेले आमदार आहेत त्यांचाही सन्मान राखला गेला पाहिजे. छगन भुजबळ पालकमंत्री आहेत त्यांनी या आमदारांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळलं पाहिजे. तरुण मुलं आहेत त्यामुळे सांभाळून घेतलं पाहिजे. चढाओढ अहंकार असता कामा नये तरच महाविकास आघाडीची चाकं पुढे जातील, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!