Share

ज्यांनी चाखली त्यांनाच कळली,नागालँडची ‘राजा मिर्ची’- नरेंद्र मोदी

Published On: 

नवी दिल्ली: वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नागालँडमधील सर्वात तिखट  मिर्ची “राजा मिर्ची” बद्दल एक ट्वीट केले.नागालँडच्या या मिर्चीला भूत जोलोकिया आणि भूत मिरची देखील म्हणतात. या मिर्चीची निर्यात थेट लंडनला करण्यात आली आहे. याबाबत पियुष गोयल यांनी ट्वीटरवर माहिती दिली. हेच ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर करत ‘ज्याने भूत जोलोकिया खाल्ली आहे त्यांनाच हे समजेल की ती किती तिखट आहे’, असे म्हटले आहे.

नागालँडची ‘राजा मिर्ची’ २८ जुलैला पहिल्यांदाच गुवाहाटी येथून हवाईमार्गे लंडनमध्ये निर्यात केली गेली.स्किव्हिल हीट युनिट वर आधारित राजा मिर्ची जगातील सर्वात लोकप्रिय मिर्ची मानली जाते. ही मिर्ची नागालँडच्या पेरेन जिल्हा टेनिंग येथून आणून गुवाहाटीच्या एपीएडीए सहाय्यक पॅकहाऊसमध्ये पॅक करण्यात आली. याला २००८ मध्ये जीआय प्रमाणपत्र मिळाले आहे.नागालँडची राजा मिर्ची सोलानासी कुटुंबातील कॅप्सिकम या कुळातील आहे.जगातील सर्वात तिखट मिर्ची म्हणून नागालँडची ‘राजा मिर्ची’ कडे पहिले जाते. जगातील सर्वात तिखट मिर्चीच्या यादीतही “राजा मिर्ची” चे नाव येते.

दरम्यान या मिर्चीची निर्यात थेट लंडनला निर्यात केल्याने नरेंद्र मोदी यांनी ही बातमी आनंदाची असल्याचे म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!