औरंगाबाद : शहरासह अन्य मनपाच्या निवडणुका एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या होत्या. मात्र कोरोनामुळे या निवडणुका लांबणीवर पडली होती. इतर सर्व शहराच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी मतदार यादी नव्याने तयार करण्याचे आदेश निवडणुक आयोगाने दिले आहेत. यात १५ जानेवारी २०२१ च्या सुधारीत यादीनुसार घेण्याचे आदेश दिले. हीच यादी शहरालाही लागू होण्याचे संकेत मिळाले आहेत.
गेल्या वर्षी शहरासोबत नवी मुंबई, वसई-विरार आणि कोल्हापूरच्या मनपा निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया सोबत पार पडल्या होत्या. मात्र शहराची निवडणुक प्रक्रिया न्यायालयात अडकल्याने निवडणुका होण्यासाठी अडचण येत आहेत. इतर सर्व मनपाच्या निवडणुका घेण्यासाठी आयोगाने मंगळवारी आदेश देऊन नव्याने मतदार यादी तयार करुन नवीन मतदारांना यापासून वंचित ठेवण्यात येणार नसल्याचे सांगितले. त्यानुसार हाच नियम सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू करण्यात येणार आहे. नऊ मार्च रोजी मनपाच्या वॉर्ड आरक्षण आणि प्रभाग सोडतीवर घेतलेल्या आक्षेपावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
याबाबत दोन फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार होती. मात्र आठ पैकी तीनच विभागाने आपले म्हणणे सादर केले असून इतर विभागांनी आपले म्हणने सादर करण्यासाठी मुदत दिली असून पुढील सुनावनी नऊ मार्च रोजी घेण्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहेत. त्यानुसार या दिवशी सुनावनी होऊन अंतीम आदेश दिल्यास नव्याने पूर्ण कारवई होऊ शकते. अथवा सर्व योग्य असल्याने कारवाई कायम करण्याचे दिल्यास एप्रिल मे महिन्यात निवडणुका होऊ शकत असल्याचे संकेत तज्ञांनी दिले.
महत्वाच्या बातम्या
- सेलेब्रेटींचं ‘Tweet Together’; शेतकरी आंदोलनासंबंधित सायना नेहवालनं अक्षय कुमारचं ट्विट केलं कॉपी
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना
- ‘मी शेतकऱ्याची लेक, बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी आज गाझीपूर सीमेवर जाणार’
- स्मिथसह इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ‘या’ अटीवर मिळणार आयपीएलमध्ये एन्ट्री
- “माझे काम हे मागे राहून विराटला मदत करणे हे आहे”, रहाणेचे मोठे भाष्य

