मुंबई : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांचा करोनावर इतका अभ्यास झाला आहे की करोना त्यांना झालाच नाही. आम्हाला सगळ्यांना झाला,” असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होत. करोना काळ असूनही खूप चांगलं काम केलं आहे.
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे खूप चांगली वाटचाल करत आहेत. आपलं सरकार पडणार, तीन महिन्यात कोसळणार, सहा महिन्यात कोसळणार हे विरोधक म्हणत राहिले पण त्यांना हे सरकार पाडण्यात यश आलं नाही,” असेही अजित पवार यांनी स्पष्ट केलं होत.
‘करोनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इतका अभ्यास झाला आहे की ते अर्धे डॉक्टर झाले आहेत’. यावरच महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. त्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं होतं.
यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला. “मुख्यमंत्र्यांनी करोनाचा एवढा अभ्यास केला की ते अर्धे डॉक्टरच झालेत, कोरोना त्यांच्यापाशी फिरकलाही नाही. हे मुख्यमंत्र्यांचे कौतुक आहे की अब्रू काढणे आहे हे फक्त अजित पवारच सांगू शकतात. त्यांनी संजय राऊत यांच्याकडून धडे घेतलेले दिसतायत,” असं म्हणत भातखळकर महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
सहा महिन्यांचे राशन घेऊन आलोय, आता मागे हटणार नाही; द ग्रेट खली आक्रमक!
धुळे-नंदुरबारच्या निकालावरुन महाविकास आघाडीचे भविष्य काय असेल हे स्पष्ट झाले : प्रवीण दरेकर
पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची पण गरज नाही पडणार – खडसे
भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला; अशोक चव्हाणांची भाजपवर टीका!
- मागे हटा नाहीतर खुर्च्या खाली करा शेतकऱ्यांनी केंद्राला गुडघ्यावर आणलं; शिवसेनेचा निशाणा


