Share

‘बाबासाहेबांनी स्थापन केलेली रिपब्लिकन पार्टी जिवंत राहिली तरच दीन दुबळ्यांना न्याय मिळेल’

Published On: 

🕒 1 min read

वाशीम : वाशीम येथे ‘पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये पक्ष संघटना, बूथ कमिट्या, आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पिरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपाळराव आटोटे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली पार्टी असून, ती जिवंत राहिली तर बाबासाहेब जिवंत राहतील व दीन दुबळ्यांना न्याय मिळत राहील. सध्याचे सरकार हे दलित व दिन दुबळ्यांवर अन्याय करीत आहे. अन्याय जर सुरु राहिले तर आम्ही विरोधकांशी सुध्दा हात मिळवण्यास मागे-पुढे पाहणार नाही, जसे भीमा कोरेगाव लढाईमध्ये आपल्या न्याय व हक्कासाठी इंग्रजांना साथ देवून आमच्यावर होणारे अन्याय अत्याचार दुर करुन घेतले. त्याचप्रमाणे समाजावर व दीन दुबळ्यांवर अन्याय होतच राहिले तर आम्ही सरकारची साथ सोडून देण्याची तयारी करू असे प्रतिपादन कवाडे यांनी यावेळी केले.

दरम्यान, परभणी येथेही पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा मेळावा पार पडला. यानिमित्त माध्यमांशी संवाद साधताना कवाडे म्हणाले की, १९९८ पासून आम्ही काँग्रेस पक्षासोबत आहोत. आम्ही यापूर्वीही कॉग्रेस आघाडीसोबत राहिलो. परंतू आता सत्तेवर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेतेमंडळींना मित्रपक्षांचा विसर पडला आहे. मंत्रीपदात नाहीतर किमान आम्हाला सत्तेत वाटा तरी द्यायला पाहिजे, असे मत व्यक्त करत प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी नाराजी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!