नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीकडे राज्य सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मूक आंदोलनाची हाक दिली आहे. नाशकात आज खासदार संभाजीराजे छत्रपतींचं आंदोलन होत आहे. छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ उपस्थित आहेत. आंदोलनात पुढील दिशा निश्चित होणार आहे. लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आंदोलनानंतर राज्य समनवयकांची बैठक होणार आहे.
दरम्यान, आंदोलनस्थळी भाषण करताना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींचे आक्रोश मोर्चे मराठ्यांच्याविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत असल्याचे सांगितले आहे. ‘मला काल आपल्या कार्यकर्त्यांनी आमंत्रण दिलं. छत्रपतींनीदेखील मला फोन केला. मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मताशी कोणाचंही दुमत नाही. माझ्या पक्षाची देखील तीच भूमिका आहे. कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळावं ही सगळ्यांची भूमिका आहे. अनेक अडचणी आहेत. ओबीसींचे आक्रोश मोर्चे मराठ्यांच्याविरोधात नाहीत. दोन्ही समाज अडचणीत आहेत. मराठा समाजाला आरक्षण नाही आणि ओबीसींच आरक्षण काढलं, त्यामुळे दोन्ही समाजासमोर ही अडचण निर्माण झाली आहे’, असं भुजबळ म्हणाले.
तर, कायद्याच्या कचाट्यात सापडल्यावर अडचणी निर्माण होतात. काही लोक ओबीसी आणि मराठा समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, तो योग्य नाही. शाहू फुले आंबडेकर हे आमचे दैवत आहेत. शाहू महाराजांचे वंशज समंजस, उतावीळ नाहीत आणि काय गाठायचं आहे हे त्यांना माहिती आहे. सामाजिक तेढ निर्माण होण्याचं कारण नाही. मराठा समाजाच्या प्रश्नाला भुजबळने कायम सभागृहातदेखील पाठिंबा दिला. पण भुजबळ आपला दुष्मन असल्याचं मत तयार करण्याचा काहींचा प्रयत्न असतो, असा गंभीर आरोप छगन भुजबळांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘आमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं नाही’, संजय राऊतांचा भाजपवर प्रहार
- क्रिकेटनंतर बॉलीवुडमध्ये नवी इंनिग खेळण्यासाठी श्रीसंत सज्ज
- शिवसेनेला हात लावायचा नाही हे आमचं ठरलेलं आहे – हसन मुश्रीफ
- कपिल शर्माने पहिल्यांदाच शेअर केला मुलांसोबतचा सुंदर फोटो
- ‘मी इतकंच सांगेन की..’, संभाजीराजेंचे नाशकात लोकप्रतिनिधींना आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
