Share

गडचिरोलीत २२ वैद्यकिय अधिका-यांच्या नियुक्त्या; प्रथमच जिल्हाधिकारी यांनी घेतल्या ऑनलाईन मुलाखती

Published On: 

गडचिरोली : गडचिरोली मधील आरोग्य विभागाच्या दुर्गम तसेच जिल्हा सामान्य रूग्णालयातील रिक्त २८ पदावरील गट अ च्या वैद्यकिय अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यासाठी महाराष्ट्रात प्रथमच ऑनलाईन पद्धतीने ३५ हून अधिक उमेदवारांच्या मुलाखती घेवून त्यापैकी २२ जणांची नियुक्ती अंतिम करण्यात आली. यातील सहा पदे अजूनही रीक्त आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सोशल डीस्टंसिंगची अंमलबजावणी करून राज्यातील वेगवेगळया उमेदावरांनी आपल्या मुलाखती व्हीडीओ कॉन्फरंसींगद्वारे पुर्ण केल्या. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या नाविण्यपुर्ण कल्पनेतून या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात आली.

जिल्हा निवड समितीकडून १ एप्रिल २०२० रोजी गट अ च्या वैद्यकिय अधिका-यांच्या नियुक्तीबाबत जाहिरात काढण्यात आली होती. जिल्हयातील विविध ठिकाणी २८ वैद्यकिय अधिका-यांच्या नियुक्तीबाबत अर्ज मागविण्यात आले होते. जिल्हयात दुर्गम भागात मोठया प्रमाणात रीक्त पदे असल्याकारणाने व कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर सदर प्रक्रिया तातडीने पुर्णत्वास नेहून जिल्हाधिकारी यांनी २२ जणांना नियुक्ती पत्र दिले. येत्या आठ दिवसात त्यांना रूजू होण्यासाठी कळविण्यात येणार आहे.

जिल्हा निवड समितीमध्ये जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे बरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहूल गुप्ता, सहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतूरे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे यांचा समावेश होता. तर या समितीचे सदस्य सचिव म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी काम पाहिले.

नियुक्ती दिलेल्या डॉक्टरांना तीन वर्षाचा बॉण्ड करणे आवश्यक : गडचिरोली जिल्हा आदीवासी आणि दुर्गम म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी नेहमीच आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची पदे रीक्त असतात. यासाठी जिल्हा निवड समितीने या वेळी नियुक्त केलेल्या वैद्यकिय अधिका-यांना सलग तीन वर्षाचा करार करून नोकरी न सोडण्याची अट घातली आहे. यानुसार बॉण्ड करण्यास तयार असलेल्या २२ उमेदवारांना नियुक्ती देण्याचे ठरविण्यात आले आहे.

तर यावर जिल्हाधिकारी दीपक सिंगला म्हणाले ” जिल्हयातील आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचारी संख्येची गरज आणि काम करण्यासाठी तयार असलेल्या लोकांच्या संख्येमध्ये नेहमीच तफावत आढळून येते. जिल्हा दुर्गम असल्या कारणाने याठिकाणी सामाजिक बांधिलकीतून लोकांनी सेवा देणे गरजेचे आहे. आम्ही रीक्त पदे तातडीने भरली जावीत म्हणून अतिशय सोप्या पध्दतीने निवड प्रक्रिया राबविली. वेगवेगळया जिल्हयातून यामध्ये बीड, भंडारा, नागपूर, नांदेड येथून अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घरी बसूनच ऑनलाईन पध्दतीने घेतल्या. एकुण २२ वैद्यकिय अधिका-यांना नियुक्ती आदेश देत असून, या नियुक्त्या पर्मनंट असतील. यामध्ये त्यांना तीन वर्ष तरी नोकरी सोडता येणार नाही. यातून गरज असलेल्या दुर्गम भागात आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मदत मिळणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!