Share

कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत; कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी!

Published On: 

नाशिक:- नाशिकचा कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. गेल्या महिन्यापासून कांद्याची बाजरपेठेतील आवक वाढतेय. कर्नाटकसह इतर राज्यातील कांदा तिथल्या स्थानिक बारपेठेची गरज पूर्ण करतोय. त्यामुळे नाशिकसह राज्याच्या इतर भागातील कांद्याचे भाव कोसळत चालले आहेत. मागील महिन्यात ज्या कांद्याला 70 ते 80 रुपये भाव मिळत होता तोच कांदा मागील आठवड्यात 50 रुपये तर आता 10 ते 30 रुपयांत विकला जात आहे. उन्हाळी कांद्याला 10 तर नवा लाल कांद्याला 30 रुपयापर्यंत भाव मिळतोय. त्यामुळे लवकरात लवकर निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी बळीराजासह व्यापारीही करत आहेत.

कृषि कायद्यावरुन भारत बंदची हाक दिली असतानाच नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. बाजारपेठेतील कांद्याची आवक वाढत असताना बाजारातून कांद्याला उठाव नाही. परदेशी कांद्याची आयात करणाऱ्या केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी उठवावी अन्यथा बाजार समिती बंद पाडू असा इशारा दिला जात आहे. त्यामुळे सरकारने हस्तक्षेप करत वेळीच निर्णय घेतला नाही तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातून शेतकऱ्याचा दबाव वाढत असल्यान भाजपच्या खासदार भारती पवार यांनीही वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे निर्यात बंदी उठवावी आणि व्यापाऱ्यांवर साठेबाजीच्या बाबतील लावण्यात आलेल निर्बंध उठवावे, अशी मागणी केलीय. मात्र, त्याच वेळी दिल्लीत राजकीय प्रेरित आंदोलन सुरू आहे. त्यामुळे कृषि आणि वाणिज्य मंत्र्यांना कांदा प्रश्नावर तोडगा कढण्यास विलंब होत असल्याचा दावा भाजप खासदार करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!