Share

किसान रेल्वेतून एक लाख टन कृषी मालाची देशभर वाहतूक

Published On: 

औरंगाबाद : कृषी क्षेत्राला चालना मिळावी यासाठी नांदेड रेल्वे विभाग, दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने प्रथमच नांदेड विभागातून नगरसोल येथून किसान रेल्वे सुरू करण्यात आली आहे. ९ महिन्यांमध्ये किसान रेल्वेच्या ३३७ फेऱ्या झाल्या आहेत. त्यातून जवळपास एक लाख टन कृषी मालाची देशभर वाहतूक करण्यात आली.

यावर्षी ५ जानेवारीपासून नांदेड विभागातून प्रथमच नगरसोल येथून पहिली किसान रेल्वे सुरु करण्यात आली. तेव्हापासून फक्त ९ महिन्यातच नांदेड रेल्वे विभागाने नगरसोल येथून देशभर विविध ठिकाणी किसान रेल्वेद्वारे १ लाख टनाहून अधिक कृषी मालाची वाहतूक केली आहे. यामुळे या क्षेत्रातील कृषी क्षेत्राला चालना मिळाली आहे.  नगरसोल येथून या ३३७ किसान रेल्वे द्वारे कांदा, टरबूज, टमाटे आणि द्राक्षे असा १ लाख टन माल देशभरातील विविध शहरांत जसे न्यू गुवाहाटी, मालडा टाऊन, न्यू जलपैगुरी, अगरतला, गौर, मालडा, दानकुनी, चितपूर, संक्रेल इत्यादी ठिकाणी पोहोचविण्यात आल्या आहेत.

५० टक्के वाहतूक दरात सवलत

कृषी क्षेत्राच्या मार्केटींगकरिता अडचणी मुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल्वे चालवण्याची संकल्पना भारत सरकारने सुरू केली आहे. शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स –टॉप टू टोटल’ च्या अंतर्गत किसान रेल्वेद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० % वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली.  त्या अनुषंगाने नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्व किसान रेल्वे ला वाहतुकीसाठी ५० % दर सवलत देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!