औरंगाबाद : दुचाकी-पिकअप व्हॅनमध्ये भीषण अपघात होऊन या अपघातात दुचाकीस्वार वरील एक जण जागीच ठार झाला असून अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात फर्दापूर-सोयगाव मार्गावरील वाघूर नदी पूला जवळ झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलाल नजीर तडवी व निखिल जालेखा तडवी हे दोघेजण दुचाकीवरुन (एमएच २१ बीएन ६९५९) निबांयती (ता.सोयगाव) येथून फर्दापूरकडे येत असतांना फर्दापूर येथील वाघूर नदी पूलाजवळील फर्दापूर-सोयगाव मार्गावर फर्दापूर कडून सोयगावच्या दिशेने जात असलेल्या पिकअप व्हॅन (एमएच ०४ ईवाय ४५२५) ने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती, की या अपघातात बिलाल नजीर तडवी (३०, रा.शेलुद ता.भोकरदन) हे जागीच ठार झाले. तर त्यांचे सहकारी निखिल तडवी (३०, रा.निंबायती ता.सोयगाव) हे गंभीर जखमी झाले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच फर्दापूर पोलिस ठाण्याचे सापोनि प्रतापसिंह बहूरे, पोउपनि सुधाकर दौड, पो.अ ज्ञानेश्वर सरताळे यांनी तातडीने गंभीर जखमी निखिल तडवी यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात रवाना करुन मयताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे रवाना केला.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात घरगुती वीज ग्राहकांचे मीटर होणार ‘स्मार्ट’; मुंबईसह प्रमुख महानगरांत बसविले जाणार स्मार्ट मीटर
- दुखापतीमुळे टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
- पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती’
- पुण्यातील भिडे पुलात जलपर्णी अडकल्यामुळे संपूर्ण रस्ता ब्लॉक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

