🕒 1 min read
पाचोड : पैठण राज्य मार्गावरील लिंबगाव (ता. पैठण) येथे भरधाव वेगातील आयशरने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या घटनेत एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात पाचोड पैठण राज्य मार्गावरील लिंबगाव ता. पैठण फाट्या नजीक रविवारी दुपारी घडली. संजय पंढरीनाथ गायकवाड (३९, रा. कोळी बोडखा ता.पैठण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नारायण काकासाहेब भांड (४०, रा. वडजी ता.पैठण) हे गंभीर जखमी झाले आहेत
कोळी बोडखा येथील संजय गायकवाड, नारायण भांड हे दोघे जण दुचाकीने (क्रमांक एमएच – २० ईपी ७०६१) वरुन पाचोडहून वडजीकडे जात होते. दरम्यान पाचोड – पैठण रस्त्यावरील लिंबगाव फाट्याजवळ येताच पैठणहून पाचोडकडे येणाऱ्या भरधाव वेगाने आयशर (क्रमांक एमएच १६ – ए. वाय ०४२९) ने दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली.
यात संजय गायकवाड यांना गंभीर मार लागल्याने ते घटनास्थळीच गतप्राण झाला. तर पाठीमागे बसलेले नारायण भांड हा गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी दोघांना पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. नारायण भांड यांच्यावर प्रथमोपचार करुन तातडीने औरंगाबाद घाटीत हलवले. या अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- एका दगडात दोन निशाणे : अमित शाहांना प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी काँग्रेस नेत्यांना केलं टार्गेट!
- फडणवीसांनी मराठा समाजाची दिशाभूल केलीये; समाजाने EWSच आरक्षण स्वीकारावं – संभाजी ब्रिगेड
- ‘एक आमदार’ असलेल्या राज ठाकरेंनी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करावे
- फडणवीसांच्या ‘अशा’ विधानांना मी गांभीर्याने घेत नाही – जयंत पाटील
- ‘सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना रेटून खोटं बोलण्याची सवय’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
