औरंगाबाद : सध्या रस्त्याचे व महामार्गाचे कामे सुरु आहे. याचाच भाग म्हणून औरंगाबाद-जळगाव या महामार्गाचे काम गेल्या दोन ते अडीच वर्षापासून चालू आहे. परंतु या महामार्गाचे अनेक निरपराध लोकांचे जीव जात आहे. अशीच घटना दुचाकीवरून जात असलेल्या एकाचा, खराब रस्त्यावर दुचाकी घसरल्याने मृत्यू झाला आहे. यात भरत हरणे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अपघाताचे सत्र सुरूच आहे. याचा त्रास सर्वसामान्य वाहनधारकांना होत आहेत. याचा प्रत्यय मंगळवारी दि.२ दिसुन आला. मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान फुलंब्रीहुन औरंगाबादच्या दिशेने जात असलेल्या बुलेट दुचाकी क्रमांक एमएच२० डीपी ६२०९ ही अचानक रस्त्यावरून स्लीप झाली. या दुर्घटनेत दुचाकीचालक भरत सांडु हरणे व राजु सांडु हरणे (रा. हर्सुल,औरंगाबाद) हे दोघेही गाडीवरुन खाली पडल्याने दोघांना रस्त्याचा जबर मार लागला.
यात भरत हरणे यांचा मृत्यू झाला, तर राजू हरणे यांना जबर मार लागला असुन ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- रिहानाविरुद्ध आता बॉलीवूडचा खिलाडी, सिंघम मैदानात, गैरसमज पसरवणाऱ्यांनाही सुनावले खडे बोल
- रिहानाच्या ट्विटवर राहुल गांधींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, दिल्लीतील फौजफाट्यावरून मोदींवर टीका
- रस्ता रोको किंवा इतर विरोध प्रदर्शनात सहाभागी झाल्यास सरकारी नोकरी मिळणार नाही
- ‘तू शांत रहा, आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाही’; जगप्रसिद्ध पॉपस्टारला कंगनाच प्रतिउत्तर !
- शरजील उस्मानीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटलांचे थेट योगींना पत्र

