कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये चांगलेच शाब्दिक वार पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते, आमदार, तसेच अभिनेते मिथून चक्रवर्तींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणूकांपूर्वी एकाच दिवशी भाजपने जोरदार झटके दिले होते. तृणमुलचे राज्यसभा खासदार आणि ममतांचे जवळचे मानले जाणाऱ्या दिनेश त्रिवेदींनी शनिवारी भाजपत प्रवेश केला. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची उपस्थिती होती.
राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटच्या सहकारी आणि चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या सोनाली गुहा आणि रवींद्रनाथ भट्टाचार्य यांना तृणमूल काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले जतू लाहिरी आणि माजी फुटबॉलपटू दीपेन्दू विश्वास यांनाही तृणमूल काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शीतल सरदार या तृणमूल काँग्रेस आमदारानेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मालदा जिल्हा परिषदेतील २२ सदस्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने ३८ सदस्य असलेली ही जिल्हा परिषद भाजपच्या नियंत्रणाखाली आली आहे. दुसरीकडे बंगाली अभिनेत्री तनुश्री चक्रवर्ती यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
काँग्रेसहून भाजप जाणाऱ्या आमदारांचे नाव या यादीत सामाविष्ट केले जाण्याची चर्चा होती. दक्षिण २४ परगाणतील सतगछिया जागेवर आमदार सोनाली गुहा यांनी भाजपत जाण्याचे संकेत देखील दिले होते. त्या ममता दिदींच्या नजीक मानल्या जातात. त्या चार वेळा आमदार निवडून आल्या आहेत. यंदा त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. दक्षिण २४ परगनामधील सतगछिया येथून तृणमूल काँग्रेसच्या आमदार सोनाली गुहा तिकीट न मिळाल्याने नाराज झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण आता कशाला?
- पत्नीच्या संशयानुसार सचिन वाझेनेच मनसुख हिरेनला मारले, देवेंद्र फडणवीस सभागृहात आक्रमक
- महाविकास आघाडीचा विदर्भ, मराठवाड्यावर शैक्षणिक अन्याय; परीक्षा मंडळावर एकट्या पुण्यातुन 10 सदस्य
- ‘अमृता ताई गाण्याची आवड जोपासण्याचा प्रयत्न करता… अशीच आवड जोपासा’
- मुंबईतील नाईट क्लब सर्वात आधी बंद करू, मुंबईच्या पालकमंत्र्याचे संकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
