पुणे – राज्यभरात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटू लागला आहे. सोशल मिडीयावर सुद्धा याचे पडसाद पडताना पाहायला मिळत आहेत. यातच आता मराठा आरक्षणावरुण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविषयी फेसबूकवर आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी एकाला विमानतळ पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
राजेंद्र पंढरीनाथ काकडे (वय 52, रा. माऊली बंगलो, जिल्हा परिषद शाळे जवळ, वडगाव शिंदे, ता. हवेली) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरोधात भादवि 500, 501 सह आयटी अॅक्ट क 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आनंद रामनिवास गोयल (वय 44) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र काकडे याने आपल्या फेसबुक प्रोफाईलवरून मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख करून आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत केला आहे.मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीची बदनामी करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक फेसबुकवर पोस्ट टाकून घटनात्मक पदाचा व प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लौकिकास बाधा आणणारे कृत्य करून त्यांची बदनामी केली आहे.
विमानतळ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, सर्वांनी सोशल मिडीयाचा वापर करताना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सामना’ मधील लेखावर भूषणसिंह राजे होळकर नाराज, मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- ‘सोलापूरचे पाणी पळवणारे भरणे हे चोर आहेत आणि अजित पवार हे दरोडेखोर आहेत’
- एप्रिल महिन्याच्या आयसीसी पुरस्कारात पाकिस्तानच्या बाबर आझमने मारली बाजी
- बीडचा ‘कृषी विमा पॅटर्न’ आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठरणार संजीवनी
- ‘आंदोलन दडपण्यासाठीच भरणे यांनी इंदापूरचे शेतकरी व शिवसैनिकांना बोलावले’


