मुंबई: शिवसेनेला आज मोठा धक्का बसला आहे.मुंबईत सेनेच्या कार्यकर्त्यावर ईडीने कारवाई केली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले शिवसेना नेते राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. यावरच आता भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रतिक्रिया देत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
ठेकेदारी, कंत्राटदार, कमिशन याचा धंदा गेली २५ वर्ष चालू आहे. त्याविरोधातला हा केंद्रीय यंत्रणांचा लढा आहे. ज्याने भ्रष्टाचार केला नाही, त्याला घाबरण्याचे कारण नाही. मात्र यावर जर कुणी प्रतिक्रिया देत असेल तर त्यांनी सुप्रसिद्ध दोन गाणे आहेत. ती नक्की ऐकावी. एक म्हणजे ‘चोरो को सारे नजर आते हे चोर’ आणि दुसरं ‘ये चोर मचाए शोर’ अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे.
दरम्यान यावरच आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “सर्व सेंट्रल एजन्सीज या भाजपच्या प्रचार यंत्रणा झाल्या आहेत. महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणारही नाही. महाराष्ट्रावर आधीही आक्रमक झालं आहे. हे दिल्लीच आक्रमण आहे.”
दरम्यान राहुल कनाल युवासेनेचे पदाधिकारी असून शिर्डी देवस्थानाच्या विश्वस्तांपैकी ते एक आहेत. आयकर विभागाचे अधिकारी मंगळवारी (८ मार्च) सकाळी सीआरपीएफ जवानांची सुरक्षाव्यवस्था घेऊन त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यानंतर अधिकाऱ्यांनी याठिकाणी तपासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीत शिवसेनेचे आमदार नाराज? संजय राऊत म्हणाले…
- रवींद्र जडेजाला कसोटीत पाच नंबरला खेळवू नका, माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य
- लोकांच्या मनातील राग मतपेटीतून बाहेर येईल – संजय राऊत
- महिला दिनानिमित्त मुंबई पोलिसांच्या महिला कर्मचाऱ्यांना मिळालं मोठं गिफ्ट..!
- पीच क्युरेटरमुळे भारताने WTCचा सामना गमावला? समोर आली मोठी माहिती


