औरंगाबाद: जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना मात्र सोयगाव येथील कोविड केअर सेंटरचे काम कासव गतीने सुरु आहे. अशा परिस्थितीत नवीन रुग्णांची मात्र गैरसोय होताना दिसत आहे. एकीकडे रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे तर दुसरीकडे कोविड केअर सेंटर येथे खाटा उपलब्ध नसल्याने आधीच रुग्णांची गैरसोय होत होती, त्यामुळे आता नवीन कोविड केअर सेंटर बांधण्यात येत असले तरी त्याचे काम संथगतीने सुरु आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांना विलगीकरण व उपचार करण्यासाठी तालुक्यातील आरोग्य केंद्र अपुरे पडू लागल्यामुळे मागील पहिला टप्प्यात शासनाने नव्या कोविड केअर सेंटरला मंजुरी दिलेली आहे. सोयगाव तालुक्यात जरंडी येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तर व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते येथील सेंटरचे उद्घाटन करण्यात आले होते, परंतु संबंधित गुत्तेदाराने अर्धवट काम सोडल्यामुळे आता कोरोनाच्या रुग्णांना कुठे ठेवावे, असा प्रश्न आरोग्य विभागासमोर निर्माण झाला आहे.
सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना सुरू आहे. सोयगाव तालुक्यातील रुग्णांना विलगीकरण आणि उपचारासाठी जरंडी आरोग्य केंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे हे केंद्र अपुरे पडत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने निधी देऊन सुरू केलेले सोयगाव येथील कोविड केअर केंद्र अजूनही तयार झालेले नाही.रुग्ण नसल्याने लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रुग्णांना कोविड सेंटर अभावी हाल सोसावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- जनतेच्या हितासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी पर्वा नाही : आमदार रवी राणा
- खंडणीखोर सरकारला महिलांच्या सुरक्षिततेची काळजी नाही; भाजप नेत्याचा घणाघात
- स्वस्तधान्य दुकानातून परभणीत निकृष्ट दर्जाच्या ज्वारीचे वितरण
- भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेचा हकनाक बळी, खूनाच्या घटनेने वैजापूर हादरले
- जिंतूर तालुक्यातील दुर्दैवी घटना; लहान भावाचा जीव वाचवताना मोठ्या भावाचा जीव गेला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
