मुंबई : कोरोनामुळे राज्यातील मंदिरे गेल्या दोन वर्षांपासून बंद होती.मात्र आता कोरोना प्रभाव कमी झाल्याने नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मंदिरे उघडली आहेत. आता लवकरच दिवाळी उत्सव जवळ येत आहे. त्याच पार्शवभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्शवभूमीवर आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली असल्याची माहिती मिळते आहे. आहे.
या बैठकीत आताची कोरोनीची स्थिती लक्षात घेऊन दुकानांच्या वेळा, ट्रेनची सवलत पर्यटन आणि ॲाफिसेसच्या वेळा याबाबत महत्वाचे निर्णय होऊ शकतात. सध्या अहमदनगर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नगरमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले आहे. मात्र याचा परिणाम जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेवर होऊ नये म्हणून व्यवहार पुर्ववत करण्यासाठी सुरक्षित उपाययोजना करून सुरु असलेले निर्बंध उठवण्यासंदर्भात महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आज वर्तवली जात आहे.
दरम्यान, दसरा झाला आणि आता दिवाळी हा मोठा सण येणार आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणावर लोक गर्दी करतात, मंदिर उघडलेली आहेत अनेक कार्यक्रमांना परवानगी दिलेली आहे आणि चित्रपटगृहे देखील उघडणार आहेत. आता दिवाळीसाठी कोणते निर्बंध असणार हे आजच्या बैठकीत ठरू शकते. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कमी प्रतिच्या गांजामुळेच विरोधकांची बेताल बडबड – संजय राऊत
- ‘ठाकरे-पवार सरकार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोरा’चे घोटाळेबाज सरकार’, किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
- ‘ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते आज त्यांच्याच कौतुकाचा तुणतुणा वाजवण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे
- जातीयवादी टिप्पणी प्रकरणी युवराज सिंगला अटक आणि जामीनही…
- ‘पडद्यामागची वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे’, केशव उपाध्येंचा प्रतिटोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

