🕒 1 min read
सोलापूर : केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत मागील अडीच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. दोन महिने शांततेत चाललेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी गालबोट लागले होते.
२६ जानेवारी रोजी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ संयुक्त शेतकरी संघटनांनी दिल्लीतील हद्दीत प्रवेश करून ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. यावेळी, पोलिसांनी दिलेला मार्ग सोडून आंदोलक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दिल्लीतील इतर भागात वळवला होता. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता धुमश्चक्री उडाली होती. या आंदोलनामुळे प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागले होते. २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर मोर्चावेळी आंदोलकांनी घातलेल्या हैदोसाला दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांना जबाबदार धरलं आहे.
दरम्यान, याबाबत देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी भाष्य केले आहे. उपद्रवी लोकांनी लाल किल्ल्यावर धुडगूस घातला होता. यासंदर्भात पवार यांनी मोठा दावा केला आहे. ‘प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे शेतकरी नव्हते, तर ते सत्ताधाऱ्यांपैकीच होते’, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
‘प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घालण्यात आला त्यासंदर्भात आम्ही खोलवर जाऊन माहिती घेतली. यात, लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे लोक हे शेतकरी नव्हते, तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असे आमच्या लक्षात आले’, असा दावा करत पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तुम्ही ७० वर्षांत काय केलं, याचा हिशोब आणलाय का’
- ‘काहीही लिहू नका, तिला स्वर्गात शांतपणे राहू द्या’, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन
- आंदोलनासाठी दीर्घकाळ सार्वजनिक जागेचा ताबा घेणे चुकीचे; सुप्रीम कोर्टाने आंदोलकांना सुनावले खडेबोल
- ‘शिवाजी महाराजांच्या वाटेवर चालतो, असे सांगणारे उद्धव ठाकरे पूजा चव्हाणला न्याय देणार का’?
- फेसबुक करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण स्मार्टवॉच बाजारात आणण्याची तयारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
