🕒 1 min read
नवी दिल्ली : आज लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरूस्ती) विधेयक २०२१ पारित करण्यात आलं आहे. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० हटवण्यावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरूस्ती) विधेयक २०२१ चं जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याशी कोणत्याही प्रकारचं घेणंदेणं नाही. योग्य वेळ आल्यानंतर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यात येणार’, असे अमित शाह यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
शाह यांनी कलम ३७० हटवण्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर उत्तर देताना विरोधकांना फैलावर घेतले आहे. ‘या ठिकाणी विचारण्यात आलं की, कलम ३७० हटवल्यानंतर जी आश्वासनं दिली त्या दृष्टीनं काय केलं गेलं? कलम ३७० हटवून १७ महिने झाले आणि तुम्ही आमच्याकडून हिशोब मागत आहात. तुम्ही ७० वर्षांत काय केलं याचा हिशोब आणलाय का? जर ७० वर्ष योग्यरित्या चालला असता, तर आमच्याकडून हिशोब मागायची वेळ आली नसती’, असे म्हणत अमित शाह यांनी कॉंग्रेसचा समाचार घेतला आहे.
‘ज्यांना पिढ्यानपिढ्या शासन करण्याची संधी मिळाली त्यांनी स्वत:कडे पाहून ठरवावं की, आपण हिशोब मागण्याच्या लायक आहोत का?,’ असा सवाल करत शाह यांनी कॉंग्रेसवर घणाघात केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या जस्टिन ट्रुडो यांच्याकडून मोदींना कोरोना लसीची मागणी…
- ‘या’ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत घोटाळा, ग्राहकांचे तब्बल दीड कोटी लाटले…
- गडकरीची औरंगाबादकरासाठी मोठी घोषणा; औरंगाबाद-पुणे महामार्ग होणार डायरेक्ट अॅक्सेस
- आज मी जो काही आहे तो शरद पवारांमुळेच – सुशीलकुमार शिंदे
- विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या दोन शिक्षकांवर गुन्हा, आरोपी फरार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
