मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा वाढतच आहे. सर्वसामान्यांसह बॉलिवूड कलाकारांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. त्यात बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आणि म्यूजिक कंपोजर ‘बप्पी लहरी’ यांना सुद्धा करोनाची झाली होती.
बप्पी लहरी यांना मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याआधी देखील बऱ्याच बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. बॉलिवूडसह क्रिकेटपटूंना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
मात्र, बप्पी लहरी यांच्या बद्दल मोठी बातमी समोर आली आहे. ते आता कोरोना संसर्गामधून पूर्णपणे बरे झाले आहेत. बप्पी लहरी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. घरी परतल्यानंतर बप्पी लहरी यांनी प्रथम ब्रीच कँडी रुग्णालयाचे आभार मानले ज्यांनी त्यांना कोरोना विषाणू विरूद्धची लढाई जिंकण्यास मदत केली. बप्पी लहरी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ते आनंदी दिसत आहेत. फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- कामगारांची कोरोना तपासणी न केल्याने मेडिकल व्यावसायिकांना दंड
- शरद पवार यांच्या पित्ताशयावर यशस्वी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया ;तब्येत स्थिर – नवाब मलिक
- वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या व्हायरल व्हिडिओवर काही लोकांना आपत्ती; म्हणाले मुस्लिम…
- राहुल द्रविड धोनीवर भडकला होता, सेहवागने सांगितला किस्सा
- सचिन वाझेचा आणखी पाय खोलात, ईडीकडूनही चौकशी होण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

