🕒 1 min read
नवी-दिल्ली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा आज(२८ डिसें.) स्थापना दिवस आहे. २८ डिसेंबर १९८५ ला याची स्थापना झाली असून आज तब्बल १३७ वर्ष पूर्ण झाली आहेत. देशभरात आजचा दिवस ‘काँग्रेस स्थापना दिवस’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज नवी दिल्ली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु यावेळी अत्यंत वाईट गोष्ट घडल्याचे समोर आले आहे.
आज राजधानी दिल्लीमध्ये असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयात ‘काँग्रेस स्थापना दिवस’ हा कार्यक्रम पार पडला. परंतु यावेळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम व्यवस्थित होऊ शकला नाही. कारण, यावेळी काँग्रेसच्या हंगामी पक्षाध्यक्ष आणि सर्वेसर्वा सोनिया गांधींनी(Sonia Gandhi) पक्षाचा झेंडा फडकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या खांबाला सोडून थेट झेंडा खाली आला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोरी नीट बांधली गेली नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समजते. याप्रकारानंतर कार्यक्रमात उपस्थित राहुल गांधी(Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी(Priyanka Gandhi) यांनी कार्यकर्त्यांना ध्वजारोहण करण्यास सांगितले. तेवढ्यात एक कार्यकर्ता आला आणि ध्वज घेऊन खांबावर चढला, पण तो अर्ध्या रस्त्यानेच वर जाऊ शकला. तेवढ्यात दुसरा कार्यकर्ता आला, त्याने झेंडा बांधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिडीही मागवण्यात आली.
#WATCH | Congress flag falls off while being hoisted by party's interim president Sonia Gandhi on the party's 137th Foundation Day#Delhi pic.twitter.com/A03JkKS5aC
— ANI (@ANI) December 28, 2021
दरम्यान, यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना सोनिया गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधत इतिहास खोटा ठरवला जात असल्याचे सांगितले. तसेच त्या म्हणाल्या की,’देशातील सर्वसामान्य नागरिक असुरक्षित आणि भयभीत होत असून लोकशाही आणि संविधानाला बगल देऊन हुकूमशाही चालवली जात आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भारत आणि सनातन संस्कृती या दोघांच्याही आत्म्याला दुखावण्याचा जो प्रयत्न करेल त्याला…’
- ज्या पक्षाने देशात लोकशाही प्रस्थापित केली त्याचे आम्ही वारस आहोत- राहुल गांधी
- राज्यपालांच्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये- संजय राऊत
- ‘…यामुळे सापसुद्धा चावतो ही आधीच माहीत असलेली गोष्ट नव्याने समजली’
- ‘संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना?’, रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

