Share

औरंगाबादेत ओमायक्रोनबाधित रुग्णाचा हट्ट; दहाव्या दिवशीच सुट्टीसाठी लावला तगादा!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : दुबईवरून शहरात आलेल्या तरुणाला ओमिक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्याच्यावर सध्या महापालिकेच्या मेल्ट्रॉन येथील कोविड केअर त्याच्यावर उपचार सुरू आहेत. १४ दिवसांनंतर रुग्णास घरी सोडण्यात यावे असा नियम असतांना दुबईवरून आलेला हा तरुण आपल्याला १० व्या दिवशीच घरी सोडण्यात यावे यासाठी हट्टाला पेटून बसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे महापालिकेसमोर आणखीनच पेच निर्माण झाला आहे.

शहरात ओमिक्रॉन विषाणूची दोघांना बाधा घाल्याचे समोर आले आहे. शनिवारी (दि. २५) या दोघांचा जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यातील एकजण औरंगाबादमधील मुळ रहिवासी व सध्या इंग्लंडमध्ये स्थायिक असलेल्या कुटुंबातील आहे. त्यांची मुलगी मुंबईतच पॉझिटिव्ह आली होती तर वडील औरंगाबादला आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह निघाले. दुसरा रुग्ण सिडको एन-७ येथील रहिवासी आहे.

तो दुबईहुन शहरात १७ डिसेंबरला शहरात आला. त्याचा जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेच्या मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज त्याचा दहावा दिवस होता. पण गेल्या दोन दिवसांपासून तो सुटीसाठी प्रशासनावर दबाव आणत आहे. कुठलेही तीव्र लक्षणे नसताना, हॉस्पिटलमध्ये ठेवताच कशाला? मी घरी विलगीकरणात राहतो, असे सांगून त्याने डॉक्टरांना भांडवून सोडले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!