मुंबई: भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ २०१९ ते २०२१ पर्यंत दिल्ली कॅपिटल्समध्ये होता. या दोन वर्षांच्या कालावधीत, त्याने अनेक युवा फलंदाजांना मदत केली त्यापैकी म्हणजे पृथ्वी शॉ. २०१९ मध्ये, दिल्ली कॅपिटल्सची स्थापना झाली आणि त्यांनी पदार्पणाच्या मोसमातच अंतिम चारमध्ये प्रवेश केला. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे शॉ आणि धवनची सलामीची भूमिका. कैफने शॉ बाबत आता एक खुलासा केला आहे. ज्यात शॉने त्याला एक अजब विंनती केली होती.
मोहम्मद कैफने (mohmmad kaif) खुलासा करत सांगितले, “मी तीन वर्षे दिल्ली कॅपिटल्समध्ये होतो आणि पृथ्वी शॉसोबत (prithwi shaw) खूप वेळ घालवला. त्याच्याकडे असा एक विधी होता की, सामन्यापूर्वी, मी त्याला अंडर आर्म गोलंदाजी करायचो तो परत माझ्याकडे बॉल मारायचा. एक दिवस, मी चहा घेत असताना एक खेळाडू माझ्याकडे आला आणि म्हणाला की शॉ बाहेर माझी वाट पाहत आहे. मी बाहेर पळत जाऊन त्याला विचारले काय झाले. म्हणून, तो मला म्हणाला, ‘प्लीज मला अंडरआर्म बॉलिंग करा, मला धावा मिळत नाहीये. मला हा विधी पुन्हा सुरू करायचा आहे.”
शॉ साठी तो विधी कामी आला. त्याने कोलकाता विरुद्ध ९९ धावा केल्या होत्या. जिथे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता. कैफने याबद्दलही पुढे सांगितले, “पुढच्या सामन्यात तो आत गेला आणि धावा केल्या. खेळ संपल्यावर आम्ही एकमेकांकडे बघून हसू लागलो. आम्ही एकमेकांशी बोललो नाही, फक्त बघितले आणि मी त्याला सुचवले की जर एखादा विधी चालत असेल तर तो मोडू नको. त्याने कबूल केले की त्याने चूक केली आणि आळशी झालो परंतु आपण ती पुन्हा करणार नाही असे आश्वासन दिले आणि त्यानंतर तो विधी पाळत राहिला.”
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022: ‘हाथ मत छोडना साथ मत छोडना’ दिल्लीच्या विजयाचे हिरो अक्षर- ललितचा मजेशीर VIDEO पाहिलात का?
- ऑस्कर पुरस्कार सोहळात दीपिका पदुकोणला टाइम 100 इम्पॅक्ट पुरस्कार प्रदान
- इम्रान खानचे ‘तीन मित्र’ ऐनवेळीला फिरले; आता PAK पंतप्रधानांची खुर्ची टिकणे कठीण!
- IPL 2022 : “मला आयपीएलमध्ये धोनीसारखं यश मिळवायचंय”, हार्दिक पंड्याची प्रतिक्रिया!
- “आम्हाला तुमचा अभिमान…”, वर्ल्डकपचं स्वप्न भंगलेल्या टीम इंडियासाठी विराट काय म्हणाला ते एकदा वाचाच!


