🕒 1 min read
काठमांडू : भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या मंत्रिमंडळाने संसद बरखास्त करण्याची शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी ती मान्य केली आहे.
राष्ट्रपतींनी देशात मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली आहे.आता नेपाळमध्ये 30 एप्रिल ते 10 मे दरम्यान दोन टप्प्यात निवडणूक पार पडेल.राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर ओली सरकारनं राजधानी काठमांडूमधील सुरक्षा वाढवली आहे.
पंतप्रधान के. पी. ओली यांनी रविवारी दुपारी तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली. याच बैठकीत संसद भंग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, यामागचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
येत्या ३० एप्रिलला नेपाळमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान होणार असून १० मे रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नेपाळमध्ये नवीन सरकार अस्तित्वात आलेलं असेल.
दरम्यान,ओली यांनी संसद विसर्जित करण्याची शिफारस केली असली तरी नेपाळच्या राज्यघटनेत याबाबत कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे ओली यांच्या या निर्णयाला नेपाळमधील राजकीय पक्ष कोर्टामध्ये आव्हान देण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- ”राम मंदिर आंदोलनात ज्यांनी केवळ राजकीय घुसखोरी केली त्यांनाच रामवर्गणीची पोटदुखी होतेय”
- भारतात मुस्लिमांचा अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा- साक्षी महाराज
- पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’च्या वेळी थाळीनाद करा, शेतकऱ्यांचे आवाहन
- दुखापतग्रस्थ मोहम्मद शमीच्या जागी लागणार ‘या’ युवा खेळाडूची वर्णी
- शिवसेनेला धक्का देत ‘हा’ माजी आमदार करणार आज भाजपमध्ये प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
