🕒 1 min read
मुंबई : ‘राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? असा परखड सवाल शिवसेनेनं उपस्थितीत केला आहे. तसंच,’श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधले जात आहे. चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड 2024चा निवडणूक प्रचार आहे. रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हा तरी थांबवायलाच हवा’ असा सल्लावजा टोला सामनामधून भाजपला लगावला आहे.
शिवसेनेनं राम मंदिरासाठी घेण्यात येणाऱ्या वर्गणीवरुन भाजपवर टीका केल्यानंतर आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राम मंदिर आंदोलनात ज्यांनी केवळ राजकीय घुसखोरी केली त्यांनाच रामवर्गणीची पोटदुखी होतेय,असा घणाघात शेलार यांनी केला आहे.
या आंदोलनात ज्यांची केवळ होती राजकीय घुसखोरी
त्यांनाच झाली होती राम मंदिराच्या भूमी पुजनाची पोटदुखी
आणि
त्यांनाच आता डोळ्यात खूपतेय "रामवर्गणी"राम भक्त हो!
मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवणाऱ्यांना स्वतःच्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे?
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 21, 2020
या आंदोलनात ज्यांची केवळ होती राजकीय घुसखोरी, त्यांनाच झाली होती राम मंदिराच्या भूमी पुजनाची पोटदुखी आणि त्यांनाच आता डोळ्यात खूपतेय. रामवर्गणी राम भक्त हो! मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवण्यांना स्वत:च्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे?असा जोरदार टोला शेलार यांनी लगावला आहे.
यावर भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांना चागलाच फैलावर घेतलं आहे. ‘लाज सोडली शिवसेनेनी… शिवसेनेने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्य भर फक्त वापर केला. महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता. ज्यांचं घर वर्गणीतून चालतं तेच विचारतायत मंदिर वर्गणीतून बांधणार काय. जनाची नाही पण किमान मनाची तर ठेवा’. असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- यासाठी मी आमदार निलेश लंकेंचा प्रचारक म्हणून काम करणार- अण्णा हजारे
- भारतात मुस्लिमांचा अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा- साक्षी महाराज
- पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’च्या वेळी थाळीनाद करा, शेतकऱ्यांचे आवाहन
- दुखापतग्रस्थ मोहम्मद शमीच्या जागी लागणार ‘या’ युवा खेळाडूची वर्णी
- शिवसेनेला धक्का देत ‘हा’ माजी आमदार करणार आज भाजपमध्ये प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
