मुंबई : खासदार नवनीत राणा यांनी निवडणूक उमेदवारी अर्ज सादर करतांना त्या सोबत जोडलेले जात वैधता प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द ठरवले आहे. इतकेच नाही तर खासदार राणा यांना दोन लाख रुपयांचा दंड लावला आहे. त्यातच उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर राणा यांनी टीका केलीय. खासदार राणा यांनी ठाकरे यांच्यावर टीका करतांना मुख्यमंत्र्यांची लायकी नसल्याचे म्हटले आहे. राणा यांच्या या वक्तव्यावर शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी चांगलाच समाचार घेतलाय.
या संदर्भात आमदार यामिनी जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खासदार राणा यांच्यावर पलटवार केलाय. त्यांनी लिहिले की, ‘अहो राणा मॅडम, लायकीवर तुम्ही बोलावं, हाच मोठा विनोद आहे. खोटे जात प्रमाणपत्र प्रकरणी तुमची लायकी मान. उच्च न्यायालयाने आजच दाखवून दिली आहे. आता खासदारकीचे थोडेच दिवस उरलेत. ते जरा शांततेत घालवा आणि भाजपच्या तालावर नाचू नका.’
शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये भायखळा मतदार संघातून विजय मिळवला होता. एमआयएमचे उमेदवार वारीस पठाण यांना पिछाडीवर टाकत त्यांनी विजय मिळवला होता. आता त्यांनी खासदार राणा यांचाही चांगलाच समाचार घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- एक महिना तीन दिवस झाले तरी राज्य सरकाने स्वतंत्र पुनर्विचार याचिका का दाखल केली नाही?
- ‘पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाविकास आघाडीनेही राज्यातील गरिबांना भरघोस मदत करावी’
- उरवडे येथील आगीला जबाबदार कोण ? गृहमंत्री म्हणतात…
- “पीक विमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा”, परभणीत भाजप तर्फे आंदोलन
- ‘नरेंद्र मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्य सरकारने करून घेऊ नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

