मुंबई : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियान राबवण्यात आलं. त्यानंतर आता राज्य सरकारने राज्यात सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं होत. राज्यात १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ ते ११.०१ या वेळीत सामूहिक राष्ट्रगीत गायन घेण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्वाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व नागरिकांना या राष्ट्रगीत गायन उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत वेगवेगळे अभिनव उपक्रम संपन्न होत आहेत. राज्यातही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या स्वराज्य महोत्सवाचे आयोजन सुरू असून या महोत्वा अंतर्गत ‘सामूहिक राष्ट्रगीत गायन’ ही अभिनव संकल्पना पुढे आलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमात सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन एक विक्रम प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं होत.
राज्यात 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला असून याच उपक्रमाअंतर्गत 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीत गायनाचे आयोजन राज्यभर करण्यात आले होते. मंत्रालयातही मुख्य प्रवेशद्वार आणि त्रिमूर्ती प्रांगणात समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. समूह राष्ट्रगीत गायनात यावेळी मंत्रालयात नियुक्त करण्यात आलेले पोलीस पथक यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :
- Sunil Prabhu | शिवसेनेचा व्हिप सर्वजण पाळणार – सुनिल प्रभू
- Mohit Kamboj : सिंचन घोटाळ्यात राष्ट्रावादीचा हा नेता तुरुंगात जाणार; कंबोज यांचा रोख अजित पवारांकडे?
- Aditya Thackeray | व्हिप आमचाच, त्यामुळे गद्दारांना तिथे बसण्याचा अधिकार नाही – आदित्य ठाकरे
- Amol mitkari | हिंदूंचा अपमान करणाऱ्या पोंक्षेंविरुद्ध कायदेशीर कारवाई करा- अमोल मिटकरी
- Chandrasekhar Bawankule | पुराव्यांशिवाय कुणी बोलणार नाही; मोहित कंबोजांच्या ट्विटला बावनकुळेंचा दुजोरा

