🕒 1 min read
मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी देशात दोन कर्णधारांबाबत चर्चा सुरू होती. कोहलीला कसोटी आणि रोहितला मर्यादित षटकांचा कर्णधार बनवले जावे. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आणखी एक नाव समोर ते म्हणजे अजिंक्य राहणे विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यात सोडून पालकत्व रजेवर गेला होता.
त्यावेळी अजिंक्य राहणेकडे कर्णधार पद सोपवले होते. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर रहाणेला कर्णधार बनवावे याच्या चर्चा होऊ लागल्या. विशेष म्हणजे यात कोहलीचे नावच नाही. रहाणेला कसोटीचा आणि रोहितला एकदिवसीय सामन्यांचा कर्णधार बनवण्याची चर्चा सुरू आहे.
गेल्या दशकात वेगवेगळे कर्णधार असलेले संघ अधिक यशस्वी ठरले. ऑस्ट्रेलिया व विंडीजमध्ये मर्यादित षटक व कसोटी संघाचे कर्णधार वेगवेगळे आहेत. ऑस्ट्रेलियाने 2015 व 2019 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आणि विंडीजने 2012 व 2016 ची टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकली. भारतातही तशीच स्थिती असावी का, यावर जेव्हा बीसीसीआयच्या सदस्यांनी तसेच काही परदेशी खेळाडूंनीही आपली मते व्यक्त केली आहेत.
विराट कोहलीमुळे संघाला विजयाची सवय लागली. त्यामुळे त्याच्याकडील नेतृत्व हे कायम राहावे. यातील बदलाचा फटका संघाला बसू शकेल, अशी प्रतिक्रिया माजी खेळाडू मदनलाल यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- अधिवेशन संपताच राज्य सरकारचा झटका;सामान्यांसह शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार
- केरळ, तामिळनाडूत रिपाइं भाजपसोबत; तामिळनाडूत ‘इतक्या’ जागा येणार रिपाइं च्या वाट्याला !
- ‘देशात राहुल गांधींना आणि राज्यात नाना पटोलेंना कोणीही महत्व देत नाही’
- अपघातांचे प्रमाण वाढल्यानंतर शासनाला जाग, घेतला ‘हा’ निर्णय
- ‘देवेंद्रजींना पुन्हा यावचं लागेल, अजितदादा तुम्ही पण या…’ भाजप नेत्याची विधानसभेतच ‘पुन्हा’ साद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

