Share

‘आमचा नंबर द्या आम्ही त्यांना पार्टीसाठी आमंत्रित करू’ ; पुणे पोलिसांचे भन्नाट ट्वीट

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यात गेल्या महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईत देखील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दररोज दहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. दरम्यान, आता राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

परंतु ऐन लॉकडाऊनमध्ये वाढदिवस आलेल्यांची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे. अशाच एका युवाकाने चक्क पुणे पोलिसांना ट्वीट करून लॉकडाऊनमुळे होणारी त्याची अडचण व्यक्त केली. ‘सर 1 मे ला माझा वाढदिवस आहे, मित्र पार्टी दे म्हणत आहेत तर बर्थडे पार्टीसाठी किती जणांना परवानगी आहे, आणि ती भेटण्यासाठी काय करावं लागेल?’ अशा आशयाचे ट्वीट सदर युवकाने थेट पुणे पोलिसांना केले.

ट्वीटरवर नेहमीच आपल्या खास शैलीमुळे चर्चेत असणाऱ्या पुणे पोलिसांनी देखील त्याच्या ट्वीटला आता भन्नाट उत्तर दिले आहे. ‘तुमच्या मित्रांना लॉकडाऊनच्या काळात बाहेर जायचे असेल तर त्यांना आमचा नंबर द्या. आम्ही त्यांना ‘पार्टी’ साठी आमंत्रित करू, वाढदिवसाच्या ‘ऍडव्हान्स’ मध्ये शुभेच्छा. घरीच राहा, सुरक्षित राहा!’ असा खोचक सल्ला पुणे पोलिसांनी सदर युवकाला दिला आहे.

त्यामुळे आता पुणे पोलिसांनी दिलेला हा सल्ला युवक व त्याचे पार्टी मागणारे मित्र ऐकणार का ? कि वाढदिवसाच्या पार्टीसाठी पोलिसांची भेट घेणार हा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडलेला आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता सदर युवकाने यंदाचा त्याचा वाढदिवस त्याच्या घरामध्ये कुटुंबासोबतच साजरा करणे गरजेचे आहे. तरच तो स्वत: देखील सुरक्षित राहील आणि त्याचे कुटुंबीय देखील सुरक्षित राहतील.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!