Share

‘मुख्यमंत्री राज्याला भीकेला लावणार, त्यांना लॉकडाऊनशिवाय काहीच दिसत नाही’

Published On: 

रत्नागिरी : राज्यात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.

राज्यातील कोरोना स्थितीवरून महाविकास आघाडीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपने लक्ष्य केलं आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी, मुख्यमंत्री राज्याला भीकेला लावणार, या मुख्यमंत्र्याला लॉकडाऊनशिवाय काहीच दिसत नाही, असा घणाघात केला आहे. तसेच, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाऊनशिवाय काहीच बोलत नाही. त्यामुळे आता ‘मातोश्री’चं नाव बदलून ‘लॉकडाऊन’ करा,’ असा टोला देखील निलेश राणे यांनी लगावला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.

सध्या कोरोना चाचण्यांचे अहवाल तीन ते दहा दिवस या अंतराने येत आहेत. पूर्वीप्रमाणे ते 24 तासांत येतील, यावर लक्ष केंद्रीत करावे. अहवाल लवकर येत नसतील तर आपण कोरोना प्रभावीपणे रोखू शकणार नाही असे ते म्हणाले. सर्व प्रयोगशाळांची एक बैठक घेऊन त्यांना स्पष्ट निर्देश दिले पाहिजेत. घरातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर घरातील इतर सदस्यांनाही पॉझिटिव्ह रिपोर्ट लगेच दिले जात आहेत. यातून आपल्या कोरोनाविरूद्धच्या लढाईत बाधा उत्पन्न होते असे देखील फडणवीस म्हणाले.

सरकारी रूग्णालयात रेमडेसिवीर उपलब्ध आहेत, असे सांगितले जात असले तरी खाजगी रूग्णालयात ते उपलब्ध नाहीत. काही कंपन्या राज्य सरकारला ते द्यायला तयार आहेत. त्यामुळे सरकारने चर्चा केली तर ते राज्यात सहज आणि तत्काळ उपलब्ध होईल.ऑक्सिजनच्या संदर्भात मोठी कमतरता आहे. यात खूप जास्त लक्ष घालण्याची गरज आहे. ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचा मुद्दा देखील त्यांनी मांडला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!