मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द झाल्याने राज्यात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. यातच आता राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढील महिन्यात 19 जुलै रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तर 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.
दरम्यान आता ‘ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेतील कोणतीही निवडणूक घेऊ नये’ अशी भूमिका ओबीसी मंत्री आणि भाजपने घेतलेली असताना देखील पोटनिवडणुका जाही झाल्या आहेत. पोटनिवडणुका जाहीर झाल्याने मंत्र्यांमध्ये नाराजी असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून निवडणुका मागे घेण्यासाठी सांगणार आहोत अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेत पोटनिवडणुका आणि ओबीसी आरक्षण यावर भाष्य केलं. ओबीसी आरक्षण प्रश्नी आम्हाला डाटा केंद्राने द्यावा यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. कारण ५६ हजार ओबीसींच्या जागा बाधित होत आहेत, असं भुजबळ यांनी सांगितले आहे. या निवडणुका जाहीर झाल्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला असल्याचे मत भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला देखील या संदर्भात भूमीका घेण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी तशी मागणी केली. त्यांनी लिहिले की, ‘धुळे, नंदुरबार सह राज्यातील पाच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका लागल्याचे समजले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील होत असताना या निवडणुका जाहीर होणं हा ओबीसींवर घोर अन्याय आहे.’ असे त्या म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांच्या घरी बोलावण्यात आलेल्या बैठीकीतून काहीच निष्पन्न झाले नाही ?
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
- ‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश, ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीवरून भातखळकरांनी उडवली खिल्ली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
