नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणार राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. हा ठाकरे सरकारसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.
त्यानंतर आता ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. उद्यापासून महिनाभर ओबीसी संघटना आंदोलन करणार आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात होणार आहे. ओबीसी संघटनांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. नाशिकमधील भुजबळ फार्मवर झालेल्या बैठकीत यावर एकमत झालं आहे. परवा म्हणजे 17 जून रोजी दुपारी 12 वाजता जिल्ह्याभरात रस्ता रोको आंदोलन करून आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, दुसरीकडे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे. 16 जूनला म्हणजेच उद्यापासून कोल्हापुरातून पहिला मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. हे आंदोलन मूक असेल. या आंदोलनाची टॅगलाईन “आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय” अशी असेल. त्यादिवशी लोकप्रतिनिधींना बोलावं लागेल. मी काय जबाबदारी घेणार हे त्यांना सांगावं लागेल, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘रोहितचा एकच नियम, खेळ म्हणजे जिंकणे’
- ‘प्रिय अण्णा…, प्रचंड महागाई वाढलीय’, आव्हाडांच्या अण्णा हजारेंना हटके शुभेच्छा
- ‘शिवसेनेने ‘हजरत टिपू’चा विचार करावा, राम मंदिरासाठी संघ आणि हिंदू सक्षम आहे’
- दुचाकी चोरणाऱ्या दोघांच्या वेदांतनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या, चार दुचाकी जप्त
- डब्ल्युटीसी फायनलसाठी मांजरेकरच्या अंतिम एकादशमध्ये जड्डुला डच्चु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

