Share

‘प्रिय अण्णा…, प्रचंड महागाई वाढलीय’, आव्हाडांच्या अण्णा हजारेंना हटके शुभेच्छा

Published On: 

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. अण्णांवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याचदरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अण्णांना एकीकडे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दुसरीकडे मात्र सडकून टीका केली आहे.

‘प्रिय अण्णा…., प्रचंड महागाई ,पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल यांचे गगनाला भिडलेले भाव,ढासळती अर्थव्यवस्था,कोरोना मुळे कोलमडलेली आरोग्यव्यवस्था,वाढती सामाजिक दरी,चीन सोबत सीमेवरील तणाव ह्यांच्या बद्दल नाही तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हा मेसेज होता.’ असे ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहे.

समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या चाळीस वर्षांत अनेक वेळा विविध प्रश्नांवर तसेच सर्वच पक्षांच्या विरोधात छोटी मोठी अनेक आंदोलने आहेत. तुलनेने कॉंग्रेसची सत्ता असताना अण्णांनी देशात अनेक आंदोलने केली आहे. मात्र भाजप सरकारच्या काळात अण्णांनी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. यावरून अनेकदा अण्णांवर टीका सुद्धा होताना दिसून येत आहे.

देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असताना महागाईच्या भडक्याचे मोठे आव्हान अर्थव्यवस्थेपुढे उभे राहिले आहे. मे महिन्यातील घाऊक तसेच किरकोळ असे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी टप्प्यावर पोहोचले. पेट्रोलचे दर देखील गगनाला भिडले आहेत.त्यामुळे विरोधी नेते केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपावर टीका करत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!