Share

आरक्षण टिकवण्यासाठी ओबीसी समाज आक्रमक, भूजबळांच्या नेतृत्वात उतरला रस्त्यावर

Published On: 

नाशिक : एकीकडे मराठा आरक्षणासाठी राज्यात मूक मोर्चांना सुरुवात झाली असताना, तिकडे ओबीसी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आजपासून (१७ जून ) महिनाभर ओबीसी संघटना आंदोलन करणार आहेत. विशेष म्हणजे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे.

महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द झाले. राजकीय आरक्षण कायम राहावे म्हणून आघाडी सरकारने पाठपुरावा सुरू केला. मागासावर्ग आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करून प्रक्रिया सुरू केली असली तरी इतर मागासवर्ग समाजात आरक्षण रद्द झाल्याने असंतोष असल्याचे दिसून येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नाशिकमध्ये समता परिषदेने रास्ता रोको करत आंदोलन केलं. द्वारका चौकात हे आंदोलन करण्यात आलं. ओबीसी आरक्षण वाचवा यासाठी आक्रोश आंदोलन करण्यात आलं. सध्या या आंदोलनासाठी स्वत: छगन भुजबळ हे रस्त्यावर उतरले नसले, तरी त्यांच्याच नेतृत्त्वात हे आंदोलन होत आहे.

नाशिकमधील द्वारका चौकात सध्या दिलीप खैरे यांच्या नेतृत्वात ओबीसी आक्रोश आंदोलनाला सुरुवात झाली. द्वारका चौक परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!