🕒 1 min read
मुंबई : राज्यासह देशात कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्युने भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
यासोबतच, विरोधी पक्षासह महाविकास आघाडीतील नेते देखील आता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व शिक्षण विभागाच्या बैठकांना गेल्या काही दिवसांपासून वेग आला आहे. नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांविना पास केलं जाणार असून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी महत्वाचा टप्पा असलेल्या बोर्डाच्या परीक्षांचे काय होणार ? असा सवाल आता समोर उभा राहिला आहे.
दरम्यान, ‘महाविकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत आहे. त्यामुळे पालकांनी वा विद्यार्थ्यांनी याबाबत काळजी करु नये. विद्यार्थ्यांनी तणाव न बाळगता अभ्यासाची तयारी सुरु ठेवावी. जिल्हाधिकारी स्तरावर देखील परीक्षांच्या नियोजनाचा पाठपुरावा सुरु असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊनच येत्या ५ दिवसांमध्ये निर्णय घेतला जाईल. अफवांवर विश्वास ठेऊ नये,’ असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- राज्यात शनिवार-रविवार वीकेंड लॉकडाऊन; जाणून घ्या काय सुरु काय बंद ?
- लसीकरणाचा उत्सव करायला महाराष्ट्रात लसीच नाहीत, पंतप्रधानांची व्यवस्था चुकतेय – अस्लम शेख
- आता कोणत्याही क्षणी हे सरकार कोसळेल; नारायण राणेंच भाकीत
- सचिन वाझेला दिलासा, एनआयए कोठडीतून सुटका तर न्यायालयीन कोठडीत रवानगी
- ‘उद्धव ठाकरेंची शपथ घेऊन सांगणार का लसींचा किती पुरवठा झाला ? आहे का हिंमत ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
