Share

लसीकरणाचा उत्सव करायला महाराष्ट्रात लसीच नाहीत, पंतप्रधानांची व्यवस्था चुकतेय – अस्लम शेख

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचा आरोप गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारकडून केला जात आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला पुरेसा लशीचा साठा देत नसल्याचा आरोप केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी फेटाळून लावला असून महाराष्ट्रात लशीच्या तुटवड्यावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्यातील महाविकास आघाडी सरकार अशा नवीन वादाला सुरुवात झाली आहे.

आता याच मुद्द्यावरून राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. केंद्रीयमंत्री हर्षवर्धन यांच्या आरोपानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. मला कुणाशी वाद घालायचा नाही वा मला कोणाला दोष देखील द्यायचा नाही. महाराष्ट्र मोठे राज्य आहे येथे आठवड्याला 40 लाख वॅक्सिन लागतात त्यामुळे त्या दिल्या जाव्यात इतकीच आमची मागणी असल्याच राजेश टोपे म्हणाले होते.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. कोरोना लसीच्या नादात चाचण्या करण्याकडे आपलं दुर्लक्ष झाल्यानेच कोरोना वाढला अस मत मोदींनी व्यक्त केले. तसेच येत्या 11 ते 14 एप्रिलपर्यंत ‘लसीकरण उत्सव’ साजरा केला जाणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लसीच्या उत्सवावर काँग्रेस नेते व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘महाराष्ट्रातील अनेक लसीकरण केंद्रे बंद करावे लागत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नियोजन चुकतेय. मुंबईत ५० टक्क्यांहून अधिक लसीकरण केंद्रे बंद करावे लागले आहेत. उरवीत केंद्रे देखील संध्याकाळ पर्यंत बंद होतील. अशा स्थितीत लसीकरणाचा उत्सव कसा करणार ? असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारने महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाशी खेळू नये अशी विनंती देखील अस्लम शेख यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!