मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून विरोधी पक्षात बसावं लागलेल्या भाजपने आक्रमक भूमिका धारण केली आहे. विविध मंत्र्यांवर होणारे आरोप, कोरोना, अतिवृष्टी यासारखे संकट यामुळे विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. अशातच, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांमध्ये मुख्य आरोपली असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या लेटर बॉम्बमुळे आता राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यातील घडामोडींवरून सातत्याने महाविकास आघाडीला लक्ष्य करणाऱ्या भाजप खासदार नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा हल्लबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला असून आणखी काही मंत्र्यांवर गंभीर आरोप होत असल्याने हे सरकार फार काळ टिकणार नसून कोणत्याही क्षणी कोसळेल अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
‘आता काही दिवस देखील नाही तर कोणत्याही क्षणी हे सरकार कोसळेल’ असं भाकीत केलं आहे. याआधी देखील नारायण राणे यांनी सरकार कोसळणार असल्याचं विधान अनेकदा केलं आहे. यासह राणेंनी कोरोना परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी असल्याचं सांगत जो कुटुंबाला सांभाळू शकला नाही, तो महाराष्ट्राला काय सांभाळणार ? असा सवाल देखील उपस्थित केला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील अशा गंभीर आरोपानंतर महाराष्ट्रातील सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- राज्यात शनिवार-रविवार वीकेंड लॉकडाऊन; जाणून घ्या काय सुरु काय बंद ?
- मोठी बातमी : राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन ?, मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक
- एमपीएससीच्या मुद्यावरून मिटकरींनी पडळकरांना डिवचले; ट्वीट करून लगावला टोला
- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पंढरपुरातील ‘त्या’ सभेच्या आयोजकांवर अखेर गुन्हा झाला दाखल
- ‘भिडेंनी वैज्ञानिक, डॉक्टरांचा अपमान केलाय,त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

