मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग फोफावत आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोना आटोक्यात आल्याचं चित्र निर्माण झाल्यानंतर दैनंदिन जनजीवन सुरळीत झाले होते. मात्र, नियमांचे पालन न झाल्याने राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. राज्यात लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध देखील लावले जात आहे.
तर, कोरोनाचा वाढत धोका वेळीच रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण हे महत्वाचे आहे. राज्यात लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात केला गेला असून आता लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे आंबेक जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना केंद्रावरून पुन्हा माघारी फिरावं लागत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी केंद्र सरकारने अतिरिक्त साठा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी लसींची सर्वाधिक गरज महाराष्ट्राला असताना सापत्न वागणूक केंद्र सरकार देतंय अशी टीका केली आहे. केंद्र सरकारवरील टीकेनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘शपथ घेण्याची सीजन आहे म्हणुन.. लसी च्या पुरवठ्यावर केंद्र सरकार वर आरोप करणाऱ्या नेत्यांनी स्व .मा .बाळासाहेबांची नाही तर एकदा उद्धव ठाकरेंची शपथ घेऊन सांगा किती पुरवठा झाला ? आहे का हिंमत ? बघा गायब होतील सगळे’ असा टोला नितेश राणे यांनी शिवसेना नेत्यांना लगावला आहे.
शपथ घेण्याची season आहे म्हणुन..
लसी च्या पुरवठ्यावर केंद्र सरकार वर आरोप करणाऱ्या नेत्यांनी स्व .मा .बाळासाहेबांची नाही तर एकदा उद्धव ठाकरेंची शप्पत घेऊन सांगा किती पुरवठा झाला ?
आहे का हिम्मत ?
बघा गायब होतील सगळे! ????— Nitesh Rane (@NiteshNRane) April 9, 2021
महत्त्वाच्या बातम्या :
- राज्यात शनिवार-रविवार वीकेंड लॉकडाऊन; जाणून घ्या काय सुरु काय बंद ?
- मोठी बातमी : राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन ?, मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक
- आता कोणत्याही क्षणी हे सरकार कोसळेल; नारायण राणेंच भाकीत
- सचिन वाझेला दिलासा, एनआयए कोठडीतून सुटका तर न्यायालयीन कोठडीत रवानगी
- पंढरपुरात नियमांची पायमल्ली करणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांवर काय कारवाई करणार; राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल


