Share

आता राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींसाठी एकही जागा शिल्लक असणार नाही – फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंढरपूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने वारंवार सांगूनही ठाकरे सरकारने ओबीसी आणि व्हिजेएनटीसाठी कमिनशन तयार केलं नाही. त्यांचा डाटा तयार केला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी, व्हिजेएनटीमध्ये येणाऱ्या माळी, वंजारी, धनगर, लिंगायत, तेली आणि कुणबींसह अठरापगड जातींचं निवडणुकीतील हक्काचं 27 टक्के आरक्षण स्थगित केलं. याचं सर्व खापर फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर फोडलं आहे,

आता या सर्वांना आता ग्रामपंचायतीपासून ते नगरपालिकेपर्यंतच्या निवडणुकीत आरक्षित जागांवर निवडणूक लढता येणार नाही, त्यांना ओपनमध्ये जावं लागणार आहे. गेल्या 15 महिन्यात सात वेळा तारखा झाल्या. सातही वेळा सर्वोच्च न्यायालय त्यांना सांगत होतं तुम्ही कमिशन तयार करा. तरच आम्ही ओबीसी आणि व्हिजेएनटीचं निवडणुकीतील आरक्षण कामय ठेवू, पण सात वेळा तारखा देऊन 15 महिन्यात राज्यातील आघाडी सरकारने कमिशन तयार केलं नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या समाजाचं आरक्षणच बाद केलं.

माळी, धनगर, वंजारी, लिंगायत, तेली, कुणबी वेगवेगळ्या आठरापगड जातींना हक्काचं 27 टक्के आरक्षण मिळत होतं, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेत आमचे लोकप्रतिनिधी दिसायचे. आता कोर्टाने सांगितलं नवीन कमिशन तयार होईपर्यंत, त्याचा डाटा होईपर्यंत एकही जागा आरक्षित राहणार नाही. अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणूक होऊन गेल्या. आता जिल्हा परिषदा, नगरपरिषदा, उरलेल्या ग्रामपंचायती येणार आहेत.

या कोणत्याही निवडणुकीत राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे एकही ओबीसी आणि व्हिजेएनटीचा उमेदवार निवडून येऊ शकणार नाही. कारण आरक्षित गटातून जागाच शिल्लक असणार नाही. त्यामुळे ओपन प्रवर्गातून सर्वांना जावं लागले. ही परिस्थिती या सरकारने आपल्यावर आणून ठेवली आहे, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यासोबतच, उद्या कोणी तरी हाच निर्णय घेऊन कोर्टात गेलं तर शिक्षण आणि नोकऱ्यातील आरक्षणही जाईल. तेव्हा ओबीसी आणि व्हिजेएनटी समाजाने कुठं जायचं? असा सवाल देखील फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!