मुंबई – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीन स्फोटकांच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर, स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले होते. दरम्यान, या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. सबळ पुराव्यांनिशी त्यांना एनआयएने अटक केली होती.
अँटिलीया प्रकरण आणि मनसुख हिरण प्रकरणातील अटकेत असलेल्या सचिन वाझेच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचे समोर येत आहे. सचिन वाझेच्या कारनाम्यांचा ईडीकडूनही तपास केला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. वाझेच्या बँक अकाउंटमधून दीड कोटी रुपये मिळाले असून, इतर ठिकाणी मारलेल्या छाप्यादरम्यान आणखीन काही रक्कम मिळाली असल्याचे समोर आले आहे.
याबरोबरच सचिन वाझे पोलीस सेवेत असताना टीआरपी संदर्भात तपास करत होते. यादरम्यान त्यांनी या संदर्भातील आरोप असलेल्या बार्कच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून 30 लाख रुपये लाच घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यासंदर्भात ईडीकडूनही तपास केला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
एका वृत्तवाहिनेचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन आपल्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरु ठेवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी प्रत्येकी 400 ते 500 रुपये दिले जात असत. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ दिसून आली होती. याचा थेट फायदा जाहिराती मिळवण्यासाठी होत होता. असे आरोप त्यांच्यावर आहेत.
‘बार्क’ कडून सचिन वाझे यांनी गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाच्या मदतीने ३० लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. टीआरपी घोटाळ्याचा तपास करत असताना कंपनीच्या एक्झिक्युटिव्हना त्रास न देण्याच्या नावाखाली वाझेंनी लाच घेतल्याची माहिती सध्या मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधक नियमांचं योग्य पालन होत नाही – केंद्रीय आरोग्य पथक
- डेव्हीड वॉर्नरच्या ‘या’ चुकामुळे झाला हैदराबादचा पराभव
- राज्यात कडक लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज महत्वाची बैठक
- …तर माझे नाव बदला, देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारवर जोरदार प्रहार
- मोठी बातमी : राज्य सरकार 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

