मुंबई : सध्या सुरु असलेल्या आयपीएल सामन्यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडची जाहिरात चांगलीच गाजत आहे. शात स्वभाव म्हणून सर्वाना परिचीत असलेला राहुल द्रविड या जाहीरातीत रहदारीत अडकल्यामुळे रागावलेला दिसतोय. तसेच आजुबाजूच्या वाहनाची तोडफोड करत ते स्वत:ला इंदिरानगरचा गुंडा म्हणून घेतो.
मात्र भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने राहुल द्रविड हा एकदा महेंद्रसिंह धोनीवर भडकला होता असा खुलासा केला आहे. भारत पाकिस्तान दरम्यान एका मालिकेदरम्यान नवखा महेंद्रसिंह धोनी हा चुकीचा फटका खेळून बाद झाला होता. त्यांनतर द्रविड धोनीवर चांगलाच भडकला होता. तु असं क्रिकेट का खेळतोस? तुला तर सामना संपवायला हवा होता. हे संभाषण इंग्रजीतुन असल्याने सेहवागला काहीच गोष्टी उमजल्या
या प्रसंगानंतर धोनीने पुढील सामन्यात तो फटका खेळण्याचे कटाक्षाने टाळल्याचे सेहवागने सांगितले. आणि द्रविडने वेळीच कान टोचल्याने धोनीची कारकीर्दही बहरली. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी हा अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फिनीशर ओळखला जाऊ लागला. २०११च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यातही त्याने फिनीशरची भुमिका पार पाडत भारताला २८ वर्षानंतर विश्वचषक मिळवून दिला होता.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : राज्य सरकार 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत…
- ‘बाबर आझमचा खेळ पाहून शिक’ ; कोहलीला पाकिस्तानच्या माजी फास्ट बॉलर सल्ला
- …तर महाराष्ट्रात मृतदेहांचा खच पडेल, विजय वडेट्टीवार यांनी केली भीती व्यक्त
- आता दीपीका म्हणते स्वत:ला ‘इंदिरानगरची गुंडी’
- द्रविडच्या जाहिरातीचा वापर करत पोलिसांनी लोकांना दिला ‘हा’ संदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

