Share

‘आता दारूबंदी उठवण्याच्या निर्णयामुळे महिलांच्या शिव्याशाप लागून हे सरकार कोसळेल’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. दारूबंदी करण्यासाठी चंद्रपुरातील महिलांनी मोठा संघर्ष केला होता. यानंतर, मागील सरकारच्या काळात २० जानेवारी २०१५ रोजी या जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र आता महाविकास आघाडी सरकारने दारूबंदी उठवल्यानंतर भाजपसह सामाजिक कार्यकर्त्यांनी व महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी देखील ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे.

‘चंद्रपुरातील दारूबंदी उठवली म्हणजे सरकारने पुन्हा एकदा जिल्ह्यातील महिलांच्या संसाराची राखरांगोळी होण्यासाठी द्वारे खुली केली असेच म्हणावे लागेल. सध्या राज्यात कोरोना महामारीची लाट आहे. त्यात लॉकडाऊन सुरू आहे. दररोज शेकडो नागरिकांचा मृत्यू होत आहे. अशातच दारूबंदी उठवावी असा क्रूर निर्णय कोणीही घेऊ शकत नाही परंतु महाराष्ट्रातील सरकारने हा निर्णय घेतलाय, असं देसाई म्हणाल्या.

यासोबतच, दारुमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले, अनेक तरुण व्यसनाधीनतेकडे वळले आणि म्हणूनच जनआंदोलनातून चंद्रपुरात दारूबंदीचे आंदोलन सुरू झाले आणि ते यशस्वीही झाले. सरकारचा हा दारूबंदीचा निर्णय म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असाच आहे. कदाचित या निर्णयामुळे अनेक महिलांचा या सरकारला शिव्या-शाप लागून सरकार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा घणाघात देखील तृप्ती देसाई यांनी केला.

पुढे त्या म्हणाल्या, चंद्रपुरात जशी दारूबंदी झाली तोच पॅटर्न महाराष्ट्रात राबवा आणि “दारूमुक्त महाराष्ट्र करा” अशी आम्ही मागणीही केली होती. अनेक आंदोलनही केली आहेत. तर, सरकारच्या अनेक चांगल्या निर्णयांचे स्वागत ही आम्ही वेळोवेळी केले आहे. परंतु दारू पिणाऱ्यांचे समर्थन करणारे आणि दारू विक्रेत्यांना कोणताही तोटा होऊ नये यासाठी पुढाकार घेणारे हे महाविकास आघाडी सरकार आहे, हे या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे, अशा शब्दांत देसाई यांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!