औरंगाबाद : गेल्या वर्षीपासून कोरोना संसर्गाने जगभरात थैमान घातलं आहे. यात, लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहे. आता पुन्हा एकदा भारतात कोरोना संसर्ग बळावला असून पहिल्या लाटेतून अधिक मोठी समस्या निर्माण होत आहे. बेड्स, ऑक्सिजन, विविध औषधे मिळत नसल्याने कोरोनाबाधितांचा मृत्यू होत आहे.
या रोगामुळे अनेकांनी आपले वडील, आई, मुलगा, मुलगी, भाऊ, ताई, आजी, आजोबा असे नातलग गमावले आहेत. कुटुंबांचा आधारच कोरोनाने हिरवल्यामुळे कित्येक कुटुंबांसमोर भविष्याचा, सध्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. अशाच एका कुटुंबाचा आधार कोरोनाने हिरावला आहे. दुःखद बाब म्हणजे जनतेच्या सेवेसाठी त्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी नुकताच २६ एप्रिल रोजी डॉक्टर झालेल्या अवघ्या २५ वर्षीय डॉ. राहुल पवारचा मृत्यू झाला आहे.
कोरोना संसर्ग आणि म्युकरमायकोसिसचा संसर्ग अशी दुहेरी लढाई राहुल लढत होता. मात्र, त्याची मृत्यूशी झुंज ही अपयशी ठरली आहे. २६ मे बुधवारी राहुलचा उपचारादरम्यान औरंगाबादमधील एमजीम रुग्णालयात मृत्य झाला. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असताना जिद्दीच्या जोरावर त्याने डॉक्टर होण्याचे स्वप्न नुकतंच पूर्ण केलं होतं.
२६ एप्रिल रोजी त्याने फेसबुकट्वर स्वतः चा फोटो पोस्ट करत ‘अंतिम वर्ष उत्तीर्ण झालो आता अधिकृतपणे डॉ राहुल आशा विश्वनाथ पवार’ असं कॅप्शन दिलं होतं. यानंतर त्याच्या ओळखीतल्या अनेक व्यक्तींनी त्याचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या होत्या. शेती हा त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. गाळप हंगामात राहुलचे आई वडिल आणि मोठा भाऊ स्थलांतर करुन ऊस तोडणीसाठी राज्यभर प्रवास करायचे.
अशा हलाखीच्या दिवसातून कुटुंबाला चांगले दिवस येणार या आशेने जन्मदाते देखील खुश होते. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. ऊसतोड कामगाराच्या या कुटुंबातील हा पहिला डॉक्टर मुलगा कोरोनाने त्यांच्यापासून हिरावून घेतला आहे.एप्रिल महिन्याच्या अखेरीस त्याला कोरोनाही लागण झाली होती. यानंतर त्याची प्रकृती सातत्याने खालावत गेली. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने उपचारासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे, त्याला वाचवण्यासाठी त्याच्या मित्रमंडळींनी सोशल मीडियातून वर्गणी गोळा करण्याचे ठरवले.
यांनतर, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत अधिकाऱ्यांनीदेखील उपचारासाठी मदत करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर पैसे जमवण्यापर्यंत रुग्णालयाने आधीच त्याच्या उपचाराचा पुढील खर्च माफ करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, १५ मे रोजी त्याचं अखेरचा व्हिडीओ कॉल ठरला. यानंतर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. गुट्टे यांनी सांगितले, त्याला कोरोनासोबतच म्युकरमायकोसिसची लागण झाली होती. त्याची ही लढाई बुधवारी अपयशी ठरली आणि त्याचा मृत्यू झाला.
महत्त्वाच्या बातम्या
- स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटनखाना चालविणाऱ्याचा जामीन अर्ज फेटाळला
- अब्दुल सत्तार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, रखरखत्या उन्हात दुचाकीवर सुरु आहे सिल्लोड दौरा!
- सकारात्मक : पुणे शहरातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ८ हजारांच्या आत !
- शिक्षकांचा एप्रिलचा पगार ‘सीएमपी’नेच होणार, सीईओंची शिक्षक सेनेला ग्वाही!
- ‘आरक्षणासाठी लोकांना रस्त्यावर उतरण्याची चिथावणी देणाऱ्या भाजपला महाराष्ट्राचं युपी करायचंय का ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

