🕒 1 min read
सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेतून पाणंद रस्ते, शिवार रस्ते यासोबतच सिंचनाची जास्तीत जास्त कामे व्हावीत तसेच तालुक्यात सुरू असलेली सिंचनाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावीत यासाठी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार आग्रही असून गेल्या तीन दिवसांपासून रखरखत्या उन्हात ४ ते ५ किमी पायी चालून वेळ प्रसंगी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून दुचाकीवर स्वार होवून सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यात दौरा केला.
या दौऱ्यात त्यांनी तालुक्यात सुरू असलेली सिंचनाची कामे, प्रलंबित व नव्याने सुरू करावयाची सिंचन तसेच रस्त्यांची कामांची पाहणी करून परिसरातील शेतवस्तीत राहणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. सिल्लोड-सोयगाव मतदार संघातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी तसेच गावातील शिवार व पानंद रस्त्यांना रोजगार हमीची जोड देऊन मतदारसंघातील रस्ते विकासासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शासनास पाठपुरावा करून मंत्रालय तसेच औरंगाबाद येथे संबंधीत विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
मतदार संघात यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असल्याने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवार, शनिवार व रविवार रोजी तालुक्यातील दिडगाव, उपळी, सावखेडा, आमठाणा, धावडा, अंभई, नानेगाव इत्यादी गावांत याबाबत प्रत्यक्ष भेट देवून माहिती दिली. गाव शिवारात नव्याने करावयाची सिंचन तसेच रस्ता दुरुस्ती, रुंदीकरण, मजबुतीकरण याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे अवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
कामांची पाहणी करीत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्यक्ष जागेवर भेट दिली. यावेळी रखरखत्या उन्हात तसेच नांगरलेल्या शेतातून मार्ग काढत त्यांनी पायी फिरून पाहणी केली. सिंचनाची कामे सुरू असलेल्या भागात विविध ठिकाणच्या विहिरींच्या पाणी पातळीची त्यांनी पाहणी केली .आज या विहिरीतील पाणी तळाला लागले आहे. जवळच सुरू असलेली सिंचनाची कामे आता पूर्ण होईल त्यानंतर मे महिन्यातही याच विहिरींना मुबलक पाणी असेल अशा शब्दात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंचनाचे महत्व पटवून दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- सकारात्मक : पुणे शहरातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ८ हजारांच्या आत !
- शिक्षकांचा एप्रिलचा पगार ‘सीएमपी’नेच होणार, सीईओंची शिक्षक सेनेला ग्वाही!
- ‘आरक्षणासाठी लोकांना रस्त्यावर उतरण्याची चिथावणी देणाऱ्या भाजपला महाराष्ट्राचं युपी करायचंय का ?’
- प्रशासकीय मान्यता असतानाही जलकुंभाचे काम रखडले, नागरिकांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा!
- ‘आरोग्य सोडून महाविकास आघाडीची प्राथमिकता काय हे दिसून येतंय !’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
