🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे हित लक्षात घेऊन दहावी आणि बारावी राज्य मंडळाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
दरम्यान, सीबीएससी बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तर, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री रमेश निशंक पोखरियाल यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने देखील दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
‘सीबीएससी बोर्डाने दहावी च्या यंदाच्या परीक्षा रद्द करण्याचा अत्यंत योग्य स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. कोरोनाचा कहर वाढत असताना विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने ही निर्णय घेऊन राज्यातील दहावी आणि बारावी च्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती द्यावी,’ अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
‘एसएससी आणि एचएससीच्या परीक्षा यंदा घेणे योग्य होणार नाही. कोरोनाच्या कहरामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळून परीक्षा घेणे योग्य होणार नाही. या पार्श्वभूमीवर सीबीएससी बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा उचित निर्णय घेतला आहे. त्या प्रमाणेच राज्य सरकार ने निर्णय घेऊन 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वार्गोन्नती द्यावी,’ अशी सूचना रामदास आठवले यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ ; व्हायरल गाण्यावर रितेशचा भन्नाट डान्स
- कर्जाची हप्ते वसुली थांबवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोदींकडे महत्वाची मागणी !
- कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, मुख्यमंत्री ठाकरेंच पंतप्रधानांना पत्र !
- विराट कोहली ठरला दशकातील सर्वोत्तम खेळाडू
- मला चंपा म्हणणं बंद करा, अन्यथा… चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

