पंढरपूर : पंढरपूरमध्ये सध्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या मतदारसंघावर विजय मिळवण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी ठाण मांडला आहे. मतदान अवघ्या काही दिवसांवर आल्याने प्रचारसभांसह राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक रंगल्याच पाहायला मिळत आहे. भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर येथील शिवाजी चौकात प्रचारसभा घेतली. यावेळी अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांसह विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी सभेत बोलताना चंदक्रांत पाटील यांचा ‘चंपा’ असा उल्लेख करत त्यांना हिणवले आहे.
अजित पवारांच्या या टीकेला आता चंद्रकांत पाटील यांनी देखील जशास तसे उत्तर देताना चांगलच सुनावलं आहे. ‘राज्यात सत्ताबदल कसा होणार हे अजित पवारांना माहीत आहे. ते सध्या खोटा आव आणत आहेत. मला चंपा म्हणणं बंद करा. अन्यथा मग मीदेखील पार्थ पवार आणि इतरांचे शॉर्टफॉर्म सांगेन,’ असा इशारा त्यांनी दिला.
‘अजितदादांना काय झालंय हे माहित नाही. पण अलीकडच्या काळात ते जरा जास्तच जोरात आहेत. ‘सो चुहे खाकर बिल्ली आली हज को’ अशी हिंदी म्हण वापरत चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना टोला देखील लगावला आहे. पुढे ते म्हणाले, ‘मोठ्या साहेबांवर माझी पीएचडी अजून बाकी आहे, मात्र आता मी अजित पवारांवर एमफिल करणार आहे. त्यासाठी काही प्राध्यापकांची देखील भेट घेणार आहे.’
महत्वाच्या बातम्या
- ‘राऊत अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात, तर गडकरींनाही देऊ शकतात’
- पोलीस आले धावून…मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे गर्भवती बचावली; पोलीस गाडीतच झाली प्रसुती
- ‘ब्रेक दि चेन’ च्या निर्बंधांमुळे गोंधळ उडालाय ? वाचा निर्बंधांबाबत तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे
- ‘पंढरपूर महाराष्ट्राचं श्रद्धेचं ठिकाण आहे तिथे ह्या बदमाशाना जागा मिळता कामा नये’
- ‘मेरे होठों ने हर बात छुपा कर रखी थी’ म्हणत शेअर केला बोल्ड फोटो ; सोशल मीडियावर श्रुतीचा जलवा !


