पुणे : पुण्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच गौरी गायकवाड मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे पुणे ग्रामीण भागात खळबळ माजली आहे. संबंधित घटनेचा थरार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता.
दरम्यान आज सरपंच गौरी गायकवाड तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषेद घेतली, यावेळी भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ या देखील यावेळी उपस्थित होत्या. पत्रकार परिषेदत बोलताना चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर आणि त्यांच्या मंत्र्यांवर चांगलेच टीकास्त्र डागले आहे. यावेळी त्यांनी या मारहाणीचा निषेध व्यक्त करून कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? अशी विचारणा त्यांनी सरकारकडे केली आहे.
महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेमध्ये इतके धिंडवडे कुठेही बघितले नव्हते. आज दिवसा ढवळ्या बायकांवर हल्ले होत आहेत. एका बाईची बोटं तोडून टाकली, दुसऱ्या बाईला अॅट्रोसिटीच्या नावाखाली धमक्या दिल्या जात आहेत. आता आम्ही विचारू का महाराष्ट्र माझा? याची उत्तरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावी लागतील ते आपल्या राज्याचे प्रमुख आहेत कुटुंब प्रमुख आहेत यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना जाब विचारुन याचं उत्तर द्यावे अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
तसेच यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि, ‘गावच्या सरपंचावर हल्ला झाल्यानंतर बिडीओंची भूमिका काय, प्रांत अधिकारी, कलेक्टर, जिल्हा परिषद सीईओंची भूमिका काय ? अजूनही कोणी दखल घेतली नाही. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील खात्यातील सरपंचाची दखल घेतली नाही. याचा कोणीही कॉगनिझन्स घेतला नाही. तुम्ही कोणाच्या शपथा घेऊन काम करत आहात.
गौरी गायकवाडला प्रशासकीय यंत्रणेत असूनही कोणाची मदत मिळाली नाही. सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदारांना वाचवण्यासठी कायदे बनवले आहेत का? या प्रकरणातही तेच ज्योती देवरेच्या केसमध्ये तेच, औरंगाबादच्या केसमध्येही तेच आहे. याचा अर्थ आमच्या पक्षातील लोकांना वाचवण्यासाठी पोलीस यंत्रणा कशी राबत आहे हे आपल्याला दिसत आहे. कोणीतरी याची जबाबदारी घ्यायला पाहिजे असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मला मारहाण झाली असली तरी मी पुन्हा बाहेर पडणार आणि गावासाठी लढणार’
- राज्यात राजकीय संघर्ष; एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय – शरद पवार
- शेतकरी आंदोलक आक्रमक ; राकेश टिकैत यांनी केली २७ सप्टेंबरला भारत बंदची घोषणा
- अजिंक्य रहाणे शून्यावर बाद; नेटकरी म्हणाले, ‘जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा’
- ‘गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले’; संजय राऊतांनी व्यक्त केली जाहीर नाराजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

