पुणे : पुण्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच गौरी गायकवाड मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे पुणे ग्रामीण भागात खळबळ माजली आहे. संबंधित घटनेचा थरार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता.
दरम्यान आज सरपंच गौरी गायकवाड तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषेद घेतली, यावेळी भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ या देखील यावेळी उपस्थित होत्या. पत्रकार परिषेदत बोलताना सरपंच गौरी गायकवाड म्हणाली कि, लसीकरण व्यवस्थित सुरु असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी दबाव आणि त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला. आमच्या लोकांना रांगेत उभं न राहता लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती.
अनेक लोकं सकाळी ६ वाजेपासून रांगेत उभे असतात यामुळे मी स्वतः उपस्थित राहून सुरळीत लसीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र मला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी बघून घेऊ असे म्हटलं होते. एका राष्ट्रवादी कार्यकर्त्याकडून मारहाण झाली,अतिशय खालच्या पातळीवरील भाषा वापरण्यात आली, मला शिवीगाळ करण्यात आली तरी मी पुन्हा बाहेर पडणार आणि गावासाठी लढणार असल्याचे सरपंच गौरी गायकवाड यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘वसंतदादा पाटलांचं काय झालं?, पवारांवर आता…’; चंद्रकांतदादांनी दिलं राऊतांना ‘उदाहरण’
- राज्यात राजकीय संघर्ष; एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय – शरद पवार
- शेतकरी आंदोलक आक्रमक ; राकेश टिकैत यांनी केली २७ सप्टेंबरला भारत बंदची घोषणा
- अजिंक्य रहाणे शून्यावर बाद; नेटकरी म्हणाले, ‘जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा’
- ‘गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले’; संजय राऊतांनी व्यक्त केली जाहीर नाराजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

