पुणे : आज २३ नोव्हेंबर २०२०, बरोब्बर वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अभूतपूर्व राजकीय घडामोड घडली होती. राज्यात भाजपाला सत्तेबाहेर ठेवून महाविकास आघाडी आकारास येत असल्याचे निश्चित झाले असतानाच भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचे वृत्त धडकले होते. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मात्र शरद पवारांच्या खेळीमुळे हे पहाटेचे सरकार अल्पजीवी ठरले होते. मात्र या घटनेने महाराष्ट्राचे राजकारण बदलले होते.
या घटनेला वर्षपूर्ती झाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी भाष्य करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सुद्धा आता पहाटे काही करत नसतील. राजकारणात अशा गोष्टी चालतात. कटू आठवणी नको आता” असं म्हणत टोला लगावला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल, असं विधान फडणवीस यांनी केल्याने पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी हे सूचक विधान केलं आहे. ठाकरे सरकार हे बेईमानी करून आलेलं सरकार आहे. हे सरकार किती काळ टिकेल हे माहीत नाही. यावर आता बोलणं योग्य नाही. मात्र, या पुढे पहाटे शपथ घेणार नाही. योग्य वेळी शपथ घेतली जाईल, असं सूचक विधान करतानाच अशा गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘ज्यांच्या डोक्याच्या गोळ्या संपल्यात अशा वाचाळवीरांनी औकात पाहुन साहेबांवर बोलावं’
- ‘आम्ही सांगितलं होतं की पवारसाहेबांचा नाद करू नका’; धनंजय मुंडेंची तुफान फटकेबाजी
- वीजबिल माफ न केल्यास सरकारला पळता भूई करून सोडू – कर्णबाळा दुनबळे
- चार खासदार निवडून येणाऱ्या पक्षाचा नेता लोकनेता कसा ? पडळकरांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
- ‘कुठल्याही धर्माला ओवेसी यांनी कमी लेखणं चुकीचं, त्यांना वैदिक परंपरा मान्य करावी लागेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

