Share

‘कुठल्याही धर्माला ओवेसी यांनी कमी लेखणं चुकीचं, त्यांना वैदिक परंपरा मान्य करावी लागेल’

Published On: 

नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपला जुना मित्रपक्ष असलेल्या एमआयएमचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. कुठल्याही धर्माला ओवेसी यांनी कमी लेखणं चुकीचं आहे. वैदिक परंपरा त्यांना मान्य करावी लागेल. त्यांची वक्तव्यं समाजात विघटन घडवून आणतात, अशी घणाघाती टीका आंबेडकरांनी केली आहे.

“राजकीय शक्ती एकाच धर्माकडे किंवा समाजाकडे राहील या खोट्या धारणेवर हिंदुत्वाची प्रतिमा उभी केली आहे. शिवाय मुस्लिमांना राजकारणात भाग घेण्याचा कोणताही हक्क असू नये, असंही त्यातून दर्शवण्याचा खोटा प्रयत्न आहे. संसद किंवा विधिमंडळातील आमचं संख्याबळ हे हिंदुत्व आणि संघाला आव्हान आहे. आमचं अस्तित्व रोखल्यास संघ नक्कीच त्याचा उत्सव साजरा करेल” असं वादग्रस्त ट्विट ओवेसी यांनी केलं होतं.

यानंतर त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय गदारोळ निर्माण झाला होता. तर, सामाजिक तेढ निर्माण होत असल्याची भीती देखील अनेक नेत्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळेच प्रकाश आंबेडकर यांनी ओवेसींना कोणत्याही धर्माला कमी लेखणं चुकीचं असल्याचं सांगत वैदिक परंपरा त्यांना मान्य कराव्या लागतील असा सल्ला देखील दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!